-
मायक्रोसॉफ्ट या जगातील सर्वात मोठ्या सॉफ्टवेअर कंपनीने सत्या नाडेला यांची कंपनीचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली आहे. भारतीय वंशाचे नाडेला गेली ७ वर्षे कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत (फाईल फोटो
-
याआधी भारतीय वंशाच्या नाडेला या कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी होते. कंपनीच्या महसुलात लक्षणीय वाढ करण्यात नाडेला यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती.
-
सत्या नाडेला यांचा जन्म हैदराबादमध्ये झाला आणि सुरुवातीचे शिक्षण त्यांनी तिथेच घेतले. त्यांनी मनिपाल विद्यापीठातून आयटी अभियांत्रिकीची पदवी घेतली आणि अमेरिकेच्या विस्कॉन्सिन विद्यापीठातून मास्टर ऑफ सायन्स आणि शिकागो विद्यापीठातून एमबीए पूर्ण केले.
-
१९९२ मध्ये नाडेला मायक्रोसॉफ्टमध्ये दाखल झाले. मायक्रोसॉफ्टमध्ये जाण्यापूर्वी त्यांनी सन मायक्रोसिस्टममध्ये काम केले होते.
-
२००० मध्ये मायक्रोसॉफ्ट सेंट्रलचे ते उपाध्यक्ष झाले, त्यानंतर मायक्रोसॉफ्ट बिझनेस सोल्यूशन्सचे कॉर्पोरेट उपाध्यक्ष झाले, त्यानंतर मायक्रोसॉफ्ट ऑनलाईन सर्व्हिसेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष पदी नियुक्ती झाली
-
सत्य नाडेला यांचे २०१८-१९ मध्ये वार्षिक उत्पन्न ६६ टक्क्यांनी वाढून ४२.९० दशलक्ष (३०४.५९ कोटी रुपये) झाले आहे. (फोटो PTI)
-
नाडेला यांचा पगार २३ लाख डॉलर्स (१६.३३ कोटी रुपये) असला तरी यामध्ये शेअर्सचाही वाटा आहे. (फोटो PTI)
-
५३ वर्षीय नाडेला यांची २०१४ मध्ये मायक्रोसॉफ्टचा मुख्य कार्यकारी अधिकारी पदी नेमणुक करण्यात आली होती
-
नाडेला यांना २०१९ मध्ये फायनान्शियल टाईम्स पर्सन ऑफ द इयर म्हणून गौरविण्यात आले होते. त्याच बरोबर, २०२० मध्ये त्यांना ग्लोबल इंडियन बिझिनेस आयकॉनचा मानही देण्यात आला आहे. (फोटो PTI)
-
नाडेला यांच्या कार्यकाळात मायक्रोसॉफ्टच्या शेअर्सची किंमत सातपटीहून अधिक वाढली आणि कंपनीची मार्केट कॅप २ ट्रिलियन डॉलरच्या जवळ पोहोचली.(फोटो PTI)
PHOTOS: हैदराबादमधील तरुण ते मायक्रोसॉफ्ट अध्यक्ष… नाडेलांच्या खडतर प्रवासाची गोष्ट
५३ वर्षीय नाडेला यांनी कंपनीच्या महसुलात लक्षणीय वाढ करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती.
Web Title: Photos satya nadella journey from starting a job as an engineer at microsoft to becoming the company president abn