• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • माणिकराव कोकाटे
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. kajol dharmendra rekha shan tamanna shridevi tabbu asin do not put their surname know the reason and surname hrc

…म्हणून स्वतःचं आडनाव लावत नाहीत ‘हे’ कलाकार; जाणून घ्या या कलाकारांचे आडनाव

जाणून घ्या या कलाकारांची खरी आडनावे काय आहे ते…

Updated: January 3, 2022 17:23 IST
Follow Us
  • धर्मेंद्रपासून रेखापर्यंत आणि असिनपासून गोविंदापर्यंत असे अनेक बॉलिवूड स्टार्स आहेत ज्यांनी आपली नावं बदललीत. तर काहींनी आपलं आडनाव लावणं सोडून दिलं. चला तर जाणून घेऊया या कलाकारांचे खरे आडनाव काय आहे ते. 
    1/12

    धर्मेंद्रपासून रेखापर्यंत आणि असिनपासून गोविंदापर्यंत असे अनेक बॉलिवूड स्टार्स आहेत ज्यांनी आपली नावं बदललीत. तर काहींनी आपलं आडनाव लावणं सोडून दिलं. चला तर जाणून घेऊया या कलाकारांचे खरे आडनाव काय आहे ते. 

  • 2/12

    अभिनेत्री रेखाचे पूर्ण नाव भानुरेखा गणेशन आहे परंतु रेखाने कधीही तिचे आडनाव वापरले नाही. यामागचे कारण म्हणजे तिचे वडील जैमिनी गणेशन यांनी तिला त्यांचं नाव दिलं नव्हतं. 

  • 3/12

    धर्मेंद्र यांचे पूर्ण नाव धर्म सिंह देओल आहे. परंतु नाव लहान करण्यासाठी त्यांनी त्यांचे नाव धर्मेंद्र ठेवले.

  • 4/12

    अभिनेत्री असिनचे पूर्ण नाव असिन थोट्टूमकल आहे. पण तिचे हे आडनाव उच्चारण्यासाठी फार कठीण होते. त्यामुळे तिने आपले आडनाव काढून टाकले होते.

  • 5/12

    हेलन यांचे पूर्ण नाव हेलन एन्न रिचर्डसन आहे. परंतु नाव खूप मोठे होत असल्यामुळे त्यांनी आडनाव वगळले.

  • 6/12

    गोविंदाचे पूर्ण नाव गोविंदा अरुण आहुजा आहे. पण बॉलीवूडमध्ये प्रवेश करताना गोविंदाने त्याचे आडनाव वगळले होते.

  • 7/12

    श्रीदेवींचे पूर्ण नाव श्रीअम्मा यंगर अय्यप्पन होते पण एवढं मोठं नाव चाहत्यांना लक्षात राहणं कठीण होतं, म्हणून श्रीदेवींनी आडनाव काढून टाकलं.

  • 8/12

    चित्रपटसृष्टीत येण्यापूर्वी अभिनेते जितेंद्र यांचे नाव रवी कपूर होते. पण त्यांनी जेव्हा आपलं नाव बदललं तेव्हा त्यांनी आपलं आडनाव काढून टाकलं, जेणेकरून लोकांना त्यांचं नाव सहज लक्षात राहील.

  • 9/12

    अभिनेत्री तब्बूचे खरे नाव तबस्सुम हाश्मी आहे, मात्र तब्बूने कधीच आडनाव लावलं नाही.

  • 10/12

    अभिनेत्री काजोलचे पूर्ण नाव काजोल मुखर्जी आहे, पण तिने कधीही तिच्या नावासोबत आडनाव लावले नाही. काजोलला तिचे नाव आडनावाशिवाय पूर्ण वाटते.

  • 11/12

    गायक शान देखील आडनाव लावत नाही. त्याचं पूर्ण नाव शांतनू मुखर्जी आहे. लोकांना पटकन लक्षात राहावे म्हणून त्याने त्याचं नाव शान ठेवलं.

  • 12/12

    तमन्नाचे पूर्ण नाव तमन्ना भाटीया आहे. पण ज्योतिषशास्त्रावर असलेल्या विश्वासामुळे ती आडनाव लावत नाही. (फोटो – सोशल मीडियावरून साभार)

Web Title: Kajol dharmendra rekha shan tamanna shridevi tabbu asin do not put their surname know the reason and surname hrc

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.