-
स्पेनचा दिग्गज टेनिसपटू राफेल नदालने इतिहास रचला आहे. ३५ वर्षीय नदालने रशियाच्या डॅनिल मेदवेदेव याचा २-६, ६-७, ६-४, ६-४, ७-५ असा पाच सेटच्या लढतीत ऑस्ट्रेलियाच्या अंतिम फेरीत पराभव केला.
-
नदालच्या कारकिर्दीतील हे दुसरे ऑस्ट्रेलियन ओपन जेतेपद आणि एकूण २१ वे ग्रँडस्लॅम जेतेपद आहे. मेदवेदेव आणि नदालमधील अंतिम सामना ५ तास २४ मिनिटे रंगला.
-
ग्रँडस्लॅमच्या १४५ वर्षांच्या इतिहासात सर्वाधिक पुरुष एकेरीचे विजेतेपद पटकावणारा नदाल पहिला खेळाडू ठरला. त्याने स्वित्झर्लंडच्या रॉजर फेडरर आणि सर्बियाच्या नोव्हाक जोकोविचला मागे टाकले. या दोघांच्या नावावर प्रत्येकी २० ग्रँडस्लॅम जेतेपदे आहेत.
-
२००९ नंतर नदालने दुसऱ्यांदा ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धा जिंकली आहे. २००९ मध्ये नदालने अंतिम फेरीत रॉजर फेडररचा पराभव केला होता. तो अंतिम सामनाही पाच सेटपर्यंत चालला.
-
मात्र, त्यानंतर नदालला या स्पर्धेच्या अंतिम फेरीत चार वेळा पराभवाला सामोरे जावे लागले. अखेर १३ वर्षांच्या प्रतिक्षेनंतर राफेल नदालला पुन्हा ऑस्ट्रेलियन ओपन जिंकण्यात यश आले.
-
ऑस्ट्रेलियन ओपनमधील डॅनिल मेदवेदेवची ही दुसरी अंतिम फेरी होती. सलग दुसऱ्यांदा जेतेपद पटकावण्यापासून तो हुकला. यावेळी त्याला पहिल्यांदा ऑस्ट्रेलियन ओपन ग्रँडस्लॅम जिंकण्याची संधी होती. पण रोमहर्षक लढतीत त्याला पराभवाचा सामना करावा लागला. मेदवेदेवने आतापर्यंत केवळ एकच ग्रँडस्लॅम जिंकले आहे. त्याने गेल्या वर्षी यूएस ओपनमध्ये ही कामगिरी केली होती.
PHOTOS : पहिल्या दोन सेटमध्ये पीछेहाट, मग धमाकेदार कमबॅक अन् शेवटी ग्रँडस्लॅम नंबर २१!
ऑस्ट्रेलियन ओपनच्या महामुकाबल्यात पाच सेटची झुंज जिंकत राफेल नदालनं रचला महाविक्रम!
Web Title: Australian open final 2022 rafael nadal wins his 21st grand slam title adn