Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. international womens day 2022 know about first indian ladies in fields history of india information photos sdn

Women’s Day 2022 : डॉक्टर ते फायटर पायलट… विविध क्षेत्रात पहिलं पाऊल ठेवणाऱ्या भारतीय महिला

March 8, 2022 08:50 IST
Follow Us
  • International Women's Day 2022
    1/18

    जगभरात ८ मार्च रोजी महिला दिन साजरा केला जातो. हा दिवस स्त्रीत्वाचा उत्सव म्हणून ओळखला जातो.

  • 2/18

    आनंदीबाई गोपाळ जोशी : भारतातील पहिल्या महिला डॉक्टर. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करून वेळप्रसंगी समाजाचा रोष पत्करून आनंदीबाई शिकल्या, भारतातील पहिल्या महिला डॉक्टर होण्याचा मान त्यांनी मिळवला.

  • 3/18

    इंदिरा गांधी : देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान.

  • 4/18

    दुर्गाबाई कामत : दुर्गाबाई कामत या पहिल्या भारतीय महिला अभिनेत्री होत्या.

  • 5/18

    रिटा फेरिया पॉल : मिस वर्ल्डचा किताब पटकावणारी पहिली भारतीय महिला.

  • 6/18

    पी. टी. उषा : ऑलिम्पिक खेळांच्या अंतिम फेरीपर्यंत पोहचणाऱ्या पहिल्या भारतीय महिला खेळाडू.

  • 7/18

    होमी वरारावाला : छायाचित्रकार म्हणून प्रसारमाध्यमांमध्ये काम करणाऱ्या (फोटो जर्नालिस्ट) पहिल्या भारतीय महिला साडी नेसून खांद्यावर कॅमेरा घेतलेला त्यांचा फोटो त्या काळाची प्रचिती देतो.

  • 8/18

    मोहना सिंग, अवनी चतुर्वेदी आणि भावना कांत : भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच फायटर पायलट ‘सुपरसॉनिक फायटर जेट’ विमानं उडवणाऱ्या महिला.

  • 9/18

    प्रिया जिंघन : भारतीय सैन्यात भरती होणाऱ्या पहिल्या महिला.

  • 10/18

    कल्पना चावला : अंतराळात जाणारी पहिली भारतीय महिला.

  • 11/18

    पी.व्ही.सिंधू : रिओ ऑलिम्पिकमध्ये महिला बॅडमिंटन स्पर्धेत पी.व्ही.सिंधूने रौप्य पदकाची कमाई केली. ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदकाची कमाई करणारी पहिली महिला ठरली.

  • 12/18

    अदिती पंत : अंटार्टिकावर जाणाऱ्या पहिल्या भारतीय महिला.

  • 13/18

    सायना नेहवाल : ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला खेळाडू.

  • 14/18

    बचेंद्री पाल : या एव्हरेस्ट सर करणाऱ्या पहिल्या भारतीय महिला ठरल्या. १९९४ साली त्यांनी जगातील सर्वात उंच शिखर सर केले. भारत सरकारने २०१९ साली त्यांना पद्मभूषण पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान केला.

  • 15/18

    हिना सिंधू : वर्ल्डकप शुटिंग स्पर्धेमध्ये सुवर्णपदक जिंकणारी पहिली भारतीय महिला.

  • 16/18

    दीपा मलिक : २०१६ साली रिओ येथे झालेल्या पॅरालिम्पिक स्पर्धेत पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला.

  • 17/18

    मिताली राज : आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ६००० धावांचा टप्पा पार करणारी पहिली भारतीय महिला. एकदिवसीय सामन्यात २०० एकदिवसीय सामने खेळणारी ती पहिली महिला क्रिकेटपटू आहे.

  • 18/18

    फातिमा बेवी : सर्वोच्च न्यायलयातील पहिल्या महिला न्यायाधीश.

TOPICS
मराठीMarathiमराठी बातम्याMarathi News

Web Title: International womens day 2022 know about first indian ladies in fields history of india information photos sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.