-
अब्जाधीशांच्या बाबतीत भारताचा जगात दबदबा कायम आहे. त्याचबरोबर देशातील श्रीमंतांची संख्याही वाढत आहे. अलीकडेच फोर्ब्सने १०० भारतीय श्रीमंतांची यादी जाहीर केली असून त्यात महिलांचाही मोठ्या प्रमाणात समावेश आहे. रेणुका जगतियानी देखील या महिलांपैकी एक आहे. (फोटो: रेणुका जगतियानी/लिंक्डइन)
-
फोर्ब्सच्या टॉप १०० श्रीमंत भारतीयांच्या यादीत रेणुका जगतियानी यांचे नाव ४४ व्या क्रमांकावर आहे. रेणुका यांचे नाव पहिल्यांदाच फोर्ब्सच्या १०० श्रीमंत भारतीयांच्या यादीत समाविष्ट झाले आहे. (फोटो : landmarkgroup)
-
रेणुका लँडमार्क ग्रुपच्या सीईओ आहेत. त्यांची एकूण संपत्ती ४.८ अब्ज डॉलर्स म्हणजेच भारतीय चलनात ४० हजार कोटींहून अधिक आहे. (फोटो : रेणुका जगतियानी/लिंक्डइन)
-
इथपर्यंत पोहोचण्यासाठी रेणुका यांना आयुष्यात संघर्ष करावा लागला. अनेक मोठे चढउतार सहन करावे लागले. कुटुंब चालवण्यासाठी त्यांचे पती मिकी जगतियानी लंडनच्या रस्त्यावर कॅब चालवायचे. (फोटो: landmarkgroup)
-
आई-वडील आणि भावाच्या आकस्मिक निधनानंतर मिकी जगतियानी बहरीनला गेले होते. तिथे त्यांनी भावाच्या खेळण्यांच्या दुकानात लहान मुलांचे प्रोडक्ट विकायला सुरुवात केली. १० वर्षे दुकान चालवल्यानंतर ते दुबईला गेले. (फोटो : landmarkgroup)
-
मिकी जगतियानी यांनी १९९० च्या दशकात दुबईमध्ये लँडमार्क ग्रुपची स्थापना केली. हा एक मल्टीनॅशनल कंज्यूमर ग्रुप आहे जो मिडिल ईस्ट व साउथ ईस्ट एशियामध्ये कपडे, पादत्राणे, लहान मुलांची उत्पादनं, इलेक्ट्रॉनिक्स आणि फर्निचरची विक्री करतो. (फोटो : landmarkgroup)
-
लँडमार्क ग्रुप सध्या २१ देशांमध्ये २२०० पेक्षा जास्त स्टोअर चालवतो. रेणुका यांच्याबद्दल सांगायचं झाल्यास त्यांनी १९९३ मध्ये लँडमार्क जॉईन केले. आपल्या पतीचा व्यवसाय भारतात पुढे नेण्यात रेणुका यांचा मोठा वाटा आहे. (फोटो : landmarkgroup)
-
या वर्षी मे महिन्यात पतीच्या निधनानंतर रेणुका स्वतः कंपनीची धुरा सांभाळत आहेत. रेणुका यांचे पती मिकी हे दीर्घ आजाराने त्रस्त होते आणि त्यांना चालता येत नव्हते. फोर्ब्सनुसार, रेणुका जगतियानी यांची अंदाजे संपत्ती ४० हजार ४० कोटी रुपये आहे. ती त्यांना पतीकडून मिळाली आहे. (फोटो : रेणुका जगतियानी/लिंक्डइन)
-
लँडमार्क ग्रुप चेअरपर्सन असण्यासोबतच रेणुका तीन मुलांच्या आई देखील आहे. त्यांची तिन्ही मुलं आरती, निशा आणि राहुल हे संचालक मंडळात आहेत. (फोटो : landmarkgroup)
पतीने कॅब चालवून उभारला व्यवसाय, सुमारे ४० हजार कोटींच्या संपत्तीच्या मालकीण आहेत रेणुका जगतियानी
फोर्ब्सच्या श्रीमंत भारतीयांच्या यादीत रेणुका जगतियानी ४४व्या क्रमांकावर आहे. इथपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांना आयुष्यात अनेक चढउतारांना सामोरे जावे लागले आहे.
Web Title: Renuka jagtiani 40 thousand crore net worth forbes india rich list entran family business group landmark jshd import hrc