-
तुम्ही अनेकदा भिकाऱ्यांना बस, ट्रेनमध्ये किंवा रस्त्याच्या दुतर्फा भीक मागताना पाहिलं असेल. त्यांची गरिबी पाहून अनेकांना त्यांची दया येते आणि त्यांना भिक्षापोटी पैसे देतात, पण या भिकाऱ्यांमध्ये असे अनेक जण आहेत ज्यांचे बँक बॅलन्स तुमच्यापेक्षा जास्त आहे.
-
आज आम्ही तुम्हाला अशाच एका भिकाऱ्याबद्दल सांगणार आहोत ज्याची कमाई आणि एकूण संपत्ती पाहून तुम्हाला आश्चर्य वाटेल. भारतात राहणारा तो जगातील सर्वात श्रीमंत भिकारी ठरला आहे. भरत जैन असे या भिकाऱ्याचे नाव असून तो मुंबईत राहतो. (फोटो स्रोत: रॉयटर्स)
-
आर्थिक अडचणींमुळे भरत जैनला त्याचे शिक्षण पूर्ण करता आले नाही, असे सांगितले जाते. वाईट परिस्थिती असतानाही भरतने लग्न केले. त्यांच्या कुटुंबात पत्नी, दोन मुले, भाऊ आणि वडील यांचा समावेश आहे.
-
भरत जैन मुंबईतील छत्रपती शिवाजी टर्मिनस आणि आझाद मैदानावर भीक मागतो.
-
आश्चर्याची बाब म्हणजे कोट्यवधी रुपयांच्या घरांसोबतच त्याची मुंबई आणि पुण्यातही अनेक दुकाने आहेत. एवढेच नाही तर भरत जैनची मुले कॉन्व्हेंट शाळेत शिकतात.
-
मीडिया रिपोर्ट्सनुसार, भरतची एकूण संपत्ती ८ कोटी रुपये आहे. तो मुंबईत १.२० कोटी रुपयांच्या फ्लॅटमध्ये राहतो. त्यांचे मासिक उत्पन्न सुमारे ८० हजार रुपये आहे, जे सामान्य काम करणाऱ्या व्यक्तीपेक्षा कितीतरी जास्त आहे.
-
भरत मुंबईत १० ते १२ तास भीक मागतो. यातून तो दररोज सुमारे तीन हजार रुपये कमावतो. त्याचबरोबर त्याला त्याच्या दुकानाचे महिन्याला सुमारे ३० ते ४० हजार रुपये भाडे मिळते.
-
याशिवाय, त्याने आपल्या कमाईचा मोठा भाग अनेक ठिकाणी गुंतवला आहे, ज्यामुळे त्याला अधिक उत्पन्न देखील मिळते. भरतचे कुटुंब स्टेशनरीचे दुकान चालवते. यातून कुटुंबीय चांगले पैसेही कमवतात. भरतच्या कुटुंबाने आता त्याला भीक मागण्यास मनाई केली आहे, पण तरीही भरतचे भीक मागणे सुरूच आहे.
(Photos Source: Pexels)
Photos: मुंबईत आहे जगातील सर्वात श्रीमंत भिकारी; रस्त्यावर भीक मागून बनला कोट्यधीश, कमाई वाचून आश्चर्याचा धक्काच बसेल
Beggar Bharat Jain Net Worth: भरतची एकूण संपत्ती ८ कोटी रुपये आहे. तो मुंबईत १.२० कोटी रुपयांच्या फ्लॅटमध्ये राहतो.
Web Title: Meet world richest beggar bharat jain and know his net worth spl