• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • पावसाळी अधिवेशन
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. 15 august tricolor flag hoisting rules if broken can go to jail for 3 years spl

Independence Day 2024 : तिरंगी ध्वजाशी संबंधित नियम काय आहेत?, उल्लंघन केल्यास 3 वर्षांची शिक्षा

15 August Tricolor Flag Hoisting Rule: देशभरात स्वातंत्र्य दिनाची तयारी जोरात सुरू आहे. दरम्यान, ध्वज फडकावण्याचे अनेक नियम आहेत, जे मोडल्यास ३ वर्षांपर्यंत तुरुंगवास होऊ शकतो, याबद्दलच जाणून घेऊयात.

Updated: August 15, 2024 10:12 IST
Follow Us
  • 15 August Tricolor Flag Hoisting Rule:
    1/9

    उद्या 15 ऑगस्ट रोजी देश आपला 78 वा स्वातंत्र्यदिन साजरा करणार आहे. 1947 साली याच दिवशी देश ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून स्वतंत्र झाला. स्वातंत्र्य दिनानिमित्त दरवर्षी दिल्लीत एका खास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते, भारताचे पंतप्रधान लाल किल्ल्यावर ध्वजारोहण करतात. यानंतर पंतप्रधान लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून देशाला संबोधित करतात. (पीटीआय)

  • 2/9

    स्वातंत्र्य दिनानिमित्त देशातील सर्व शाळा, महाविद्यालये, कार्यालयांपासून सर्वत्र तिरंगा फडकवला जातो. जर तुम्हीही 15 ऑगस्टला ध्वजारोहण करणार असाल तर त्यासंदर्भात काही नियम जाणून घेणे अत्यंत आवश्यक आहे. तिरंग्याशी संबंधित नियमांचे उल्लंघन केल्यास तुम्हाला तीन वर्षांचा तुरुंगवास होऊ शकतो आणि दंडही भरावा लागू शकतो. (पीटीआय)

  • 3/9

    1- भारतीय ध्वज संहितेनुसार ध्वजाचा आकार आयताकृती असावा. तिरंग्याच्या लांबी आणि रुंदीचे गुणोत्तर 3:2 असावे. (पीटीआय)

  • 4/9

    २- सरकारी आदेशाशिवाय राष्ट्रध्वज अर्ध्यावर फडकवू नये. (पीटीआय)

  • 5/9

    3- ध्वजाला कधीही ओल्या अवस्थेत फडकवू नये, तसेच ध्वजावर कधीही काहीही लिहू नये. (पीटीआय)

  • 6/9

    4- तिरंगा फडकवताना नेहमी ध्वज व्यवस्थित आहे, तो फाटलेला, चिरलेला किंवा वाईट अवस्थेत फडकवला जाणार नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे. (पीटीआय)

  • 7/9

    ५- राष्ट्रध्वज जमिनीवर ठेवू नये. यासोबतच ध्वज कधीही जमिनीला स्पर्श करेन असा फडकवू नये. (पीटीआय)

  • 8/9

    6- राष्ट्रध्वजाचा अपमान करणे किंवा तिरंगा उलथापालथ करणे, फाडणे किंवा घाण करणे यासाठी 3 वर्षांपर्यंत तुरुंगवास आणि आर्थिक दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात. (पीटीआय)

  • 9/9

    7- तिरंगा ध्वज कधीही उलटा फडकावू नये. ध्वजामध्ये केसरी रंग नेहमी वरच्या बाजूस असावा. (पीटीआय)

TOPICS
मराठी बातम्याMarathi Newsस्वातंत्र्य दिन २०२४Independence Day 2024

Web Title: 15 august tricolor flag hoisting rules if broken can go to jail for 3 years spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.