-
महिलांसाठी जगातील सर्वात धोकादायक देशांची यादी समोर आली आहे. या देशांमध्ये महिला एकट्याने प्रवास करताना असुरक्षित राहतात. वर्ल्ड पॉप्युलेशन रिव्ह्यू वुमन डेंजर इंडेक्सने हा अहवाल प्रसिद्ध केला आहे. दरम्यान, आशेर आणि लिरिक फर्ग्युसन या नवरा बायको असलेल्या पत्रकार जोडप्याने 50 सर्वात लोकप्रिय पर्यटन देशांचा अभ्यास केला जेथे महिला एकट्या प्रवास करायला जाऊ शकतात. (पेक्सेल्स)
-
दक्षिण आफ्रिका
या यादीत दक्षिण आफ्रिका पहिल्या स्थानावर आहे जिथे महिला एकट्याने प्रवास करताना सर्वात असुरक्षित राहतात. केवळ 25% दक्षिण आफ्रिकेतील महिलांना रात्री एकटे चालणे सुरक्षित वाटते. (पेक्सेल्स) -
ब्राझील
महिलांसाठी सर्वात धोकादायक देशांमध्ये ब्राझील दुसऱ्या क्रमांकावर आहे. केवळ 28% ब्राझिलियन महिलांना रात्री एकट्याने प्रवास करणे सुरक्षित वाटते. महिलांच्या हत्या घडण्याच्या घटनांमध्ये ब्राझील जगात तिसऱ्या क्रमांकावर आहे. (पेक्सेल्स) -
रशिया
या बाबतीत रशिया तिसऱ्या स्थानावर आहे जिथे महिला सुरक्षित नाहीत. (पेक्सेल्स) -
मेक्सिको
महिलांसाठी सर्वात धोकादायक देशांमध्ये मेक्सिको चौथ्या क्रमांकावर आहे. येथेही महिलांच्या मोठ्या प्रमाणावर हत्या होतात. (पेक्सेल्स) -
इराण
इराण हा जगातील पाचवा देश आहे जिथे महिलांना सर्वात जास्त असुरक्षित वाटते. (पेक्सेल्स) -
डोमिनिकन प्रजासत्ताक
डोमिनिकन रिपब्लिकमधील केवळ 33% महिलांना रात्री एकट्याने प्रवास करणे सुरक्षित वाटते. (पेक्सेल्स) -
इजिप्त
इजिप्त हा महिला प्रवाशांसाठी सातव्या क्रमांकाचा धोकादायक देश आहे. (पेक्सेल्स) -
मोरोक्को
या अभ्यासानुसार मोरोक्कोच्या जवळपास निम्म्या महिलांना शारीरिक किंवा लैंगिक शोषणाचा सामना करावा लागतो. (पेक्सेल्स) -
भारत
या यादीत भारताच्या नावाचाही समावेश आहे. देशातील ३७.२% महिलांना एकट्याने प्रवास करणे असुरक्षित वाटते. (पेक्सेल्स) -
थायलंड
महिलांसाठी जगातील सर्वात धोकादायक देशांच्या यादीत थायलंड दहाव्या क्रमांकावर आहे. (पेक्सेल्स)
‘हे’ 10 देश आहेत महिलांसाठी सर्वात धोकादायक, या एका देशातील तर 72 टक्के महिला असुरक्षित
10 Most Dangerous Countries for Female: जगातील अशा 10 देशांची यादी जाहीर करण्यात आली आहे, जे महिलांसाठी सर्वात धोकादायक आहेत. येथे महिलांना एकटे फिरणे असुरक्षित वाटते.
Web Title: 10 most dangerous countries in the world for female 72 percent women of this country are unsafe spl