• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राहुल गांधी
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. indian veteran wrestler vinesh phogat won haryana elections know how much salary she will get spl

Vinesh Phogat : जुलान्यातील विजयानंतर कुस्तीपटू विनेश फोगट झाली आमदार, मिळणार ‘इतका’ पगार!

Haryana MLA salary and Allowances: हरियाणाची प्रसिद्ध कुस्तीपटू विनेश फोगट, राजकारणात आपली ताकद दाखवत २०२४च्या हरियाणा विधानसभा निवडणुकीत जुलाना विधानसभा मतदारसंघातून विजयी झाली आहे. काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवून विनेशने आपल्या खेळाच्या मैदानापासून राजकीय व्यासपीठापर्यंत एक नवा इतिहास रचला आहे.

Updated: October 8, 2024 18:58 IST
Follow Us
  • Vinesh Phogat Haryana Elections 2024
    1/9

    २०२४ च्या हरियाणा विधानसभा निवडणुकीत मध्ये भारतातील प्रसिद्ध कुस्तीपटू विनेश फोगटने जुलाना विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकिटावर विजय मिळवून एक नवीन ओळख निर्माण केली आहे. (पीटीआय फोटो)

  • 2/9

    क्रीडा विश्वात आपला झेंडा फडकवल्यानंतर तिने आता राजकारणातही यश संपादन केले आहे. दरम्यान, निवडणूक जिंकल्यानंतर आमदार झालेल्या विनेशचा पगार किती असेल? हे जाणून घेऊ (पीटीआय फोटो)

  • 3/9

    दरम्यान, हरियाणातील आमदारांना दरमहा ६०,००० रुपये पगार मिळतो. याशिवाय त्यांना वेगवेगळे अनेक भत्तेही दिले जातात. (पीटीआय फोटो)

  • 4/9

    टेलिफोनसाठी दरमहा १५,००० रुपये आणि कार्यालयीन खर्चासाठी २५,००० रुपये मिळतात. यासोबतच आमदारांना १०,००० रुपये आदरातिथ्य भत्ताही दिला जातो. (पीटीआय फोटो)

  • 5/9

    याशिवाय दैनंदिन खर्चासाठी त्यांना दरमहा ३० हजार रुपये वेगळे दिले जातात. याशिवाय, त्यांना विधानसभा मतदारसंघात जाण्यासाठी दरमहा ६०,००० रुपये भत्ता मिळतो. (पीटीआय फोटो)

  • 6/9

    एवढेच नाही तर त्यांना विधानसभेच्या अधिवेशनात उपस्थित राहण्यासाठी १५ हजार रुपये अतिरिक्त खर्च येतो. याशिवाय हरियाणाबाहेर प्रवास करण्यासाठी प्रतिदिन ५ हजार रुपये दिले जातात. (पीटीआय फोटो)

  • 7/9

    याशिवाय विनेशलाही इतर आमदारांप्रमाणेच अ गटाच्या अधिकाऱ्यांप्रमाणे वैद्यकीय सुविधाही मिळणार आहेत. प्रवासाबाबत बोलायचे झाले तर आमदारांना ट्रेन आणि फ्लाइटमध्ये फर्स्ट क्लासमध्ये प्रवास करण्याची सुविधा मिळते. (पीटीआय फोटो)

  • 8/9

    हरियाणाचे आमदार दरवर्षी ३ लाख रुपयांपर्यंत मोफत प्रवास करू शकतात आणि 18 रुपये प्रति किलोमीटर दराने रस्ता प्रवास भत्ता देखील मिळवू शकतात. याशिवाय त्यांना वर्षाला १५ लाख रुपयांचे अनुदानही मिळते. (पीटीआय फोटो)

  • 9/9

    पगार आणि भत्त्यांव्यतिरिक्त, हरियाणातील आमदारांना चारचाकी वाहनासाठी २० लाख रुपयांपर्यंत कर्ज मिळते, तर घरासाठी ६० लाख रुपयांचे गृहकर्ज दिले जाते. त्याचबरोबर घराच्या दुरुस्तीसाठी १० लाख रुपयेही उपलब्ध आहेत. (पीटीआय फोटो)
    (हेही पाहा- Haryana Election Result : विजयानंतर विनेश फोगट काय म्हणाली, किती मिळवले मताधिक्य?… )

TOPICS
निकालResultमराठी बातम्याMarathi Newsविनेश फोगटVinesh Phogatहरियाणा विधानसभा निवडणूक २०२४Haryana Assembly Election 2024

Web Title: Indian veteran wrestler vinesh phogat won haryana elections know how much salary she will get spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.