-
दक्षिण कोरियाच्या लेखिका हान कांग यांना २०२४ चा साहित्यातील नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यांच्या काव्यात्मक गद्यासाठी हा सन्मान देण्यात आला आहे. स्वीडिश अकादमीच्या नोबेल समितीचे स्थायी सचिव मॅट्स माल्स यांनी ही घोषणा केली आहे. दरम्यान, जाणून घेऊया कोण आहेत हान कांग? (फोटो: रॉयटर्स)
-
हान कांग यांना त्यांच्या प्रगल्भ काव्यात्मक गद्यासाठी हा सन्मान देण्यात येणार आहे. ज्यामध्ये ऐतिहासिक आघात आणि मानवी जीवनातील अस्थिरता अधोरेखित करण्यात आली आहे. हान कांग या दुसऱ्या कोरियन नोबेल पारितोषिक विजेत्या ठरल्या आहेत. (फोटो: रॉयटर्स)
-
हान कांग यांचे वडील हान सेउंग-वोन हे सुप्रसिद्ध कादंबरीकार आहेत. हान यांचा जन्म २७ नोव्हेंबर १९७० रोजी ग्वांगजू येथे झाला आणि नंतर त्या कुटुंबासह सोलमध्ये राहिल्या, ज्याचा उल्लेख त्यांनी त्यांच्या ग्रीक लेसन या कादंबरीत देखील केला आहे. त्यांच्या वडिलांव्यतिरिक्त हान कांग यांचा भाऊ हान डोंग रिम देखील एक लेखक आहे. (फोटो: रॉयटर्स)
-
शिक्षण
हान कांग यांनी योन्सी विद्यापीठात कोरियन साहित्यात शिक्षण घेतले. (फोटो: रॉयटर्स) -
करिअरची सुरुवात आणि आजारपण
हान कांग यांनी १९९३ मध्ये लेखिका म्हणून करिअरला सुरुवात केली. या काळात साहित्य आणि समाज या त्रैमासिकाच्या हिवाळी अंकात ‘विंटर इन सोल’सह त्यांच्या पाच कविता प्रकाशित झाल्या. विकिपीडियानुसार, हान कांग यांना मायग्रेनचा त्रास आहे. (फोटो: रॉयटर्स) -
हान कांग यांच्या आय डू नॉट बिड फेअरवेल या कादंबरीला २०२३ मध्ये फ्रान्समधील मेडिसिस पुरस्कारांमध्ये एमिल गुईमेट पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यासोबतच त्यांची गेल्या वर्षी २०२३ मध्ये रॉयल सोसायटी ऑफ लिटरेचर इंटरनॅशनल रायटर म्हणूनही निवड झाली होती. (फोटो: रॉयटर्स)
-
हान कांग यांच्या प्रमुख आंतरराष्ट्रीय कादंबरीत ‘द व्हेजिटेरियन’चा समावेश आहे. या कादंबरीचे लिखाण त्यांनी तीन भागात केले आहे. (फोटो: रॉयटर्स)
-
हान कांग यांना आतापर्यंत साहित्य क्षेत्रातील अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. (फोटो: रॉयटर्स)
यंदाचा साहित्यातील ‘नोबेल पुरस्कार’ जाहीर झालेल्या दक्षिण कोरियाच्या लेखिका ‘हान कांग’ कोण आहेत?
Who is Nobel Prize Winner South Korean writer Han Kang: दक्षिण कोरियाच्या लेखिका हान कांग यांना साहित्य क्षेत्रातील २०२४ चा नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे. चला जाणून घेऊया कोण आहेत हान कांग?
Web Title: Who is south korean writer han kang who received the nobel prize for literature spl