-
आयपीएलचे संस्थापक, अध्यक्ष आणि बीसीसीआयचे माजी सदस्य ललित मोदी यांना त्यांचा भारतीय पासपोर्ट परत करायचा आहे. यासोबतच त्यांनी लंडनमधील भारतीय उच्चायुक्तालयात यासाठी अर्जही केला आहे. ललित मोदी यांना वानुआतूचे नागरिकत्व मिळाले आहे. परराष्ट्र मंत्रालयानेही याची पुष्टी केली आहे. (Photo: Indian Express)
-
आयपीएल सुरू करणारे ललित मोदी यांच्यावर मनी लाँड्रिंग आणि परकीय चलन व्यवस्थापन कायदा १९९९ (फेमा) चे उल्लंघन केल्याचा आरोप आहे. भारत सोडल्यानंतर ललित मोदी २०१० पासून लंडनमध्ये आहे. (Photo: Indian Express)
-
वानुआतूमध्ये ‘गुंतवणूक करून नागरिकत्व’ (सीबीआय) किंवा गोल्डन पासपोर्ट कार्यक्रम लोकप्रिय आहे जो श्रीमंत व्यक्तींना त्यांचे पासपोर्ट खरेदी करण्याची परवानगी देतो. (Photo: Indian Express)
-
वानुआतूचे नागरिकत्व मिळवणे खूप सोपे आहे. येथे अर्जदाराला नागरिकत्व मिळविण्यासाठी देशात पाऊल ठेवण्याचीही आवश्यकता नाही, तो डिजिटल पद्धतीने नागरिकत्व मिळवू शकतो. (Photo: Indian Express)
-
येथील नागरिकत्वाची किंमत १.१८ कोटी ते १.३५ कोटी रुपयांपर्यंत आहे. अर्ज दाखल केल्यानंतर ३० ते ६० दिवसांच्या आत नागरिकत्व मिळू शकते. (Photo: Indian Express)
-
वानुआतूच्या लोकसंख्येबद्दल बोलायचे झाले तर, येथील लोकसंख्या फक्त ३.२ लाख आहे. (Photo: vanuatuislands/Instagram)
-
वानुआतू हा सुमारे ८३ बेटांनी बनलेला देश आहे. यातील अनेक बेटे ज्वालामुखीजन्य आहेत. (Photo: Indian Express)
-
इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार,वानुआतूचा पासपोर्ट २०२५ पर्यंत ११३ देशांमध्ये व्हिसा-मुक्त प्रवेश देऊ शकेल. (Photo: Indian Express)
-
वानुआतूमध्ये कोणतेही कर नाहीत. येथे कोणतेही उत्पन्न, मालमत्ता किंवा कोणत्याही प्रकारचा कॉर्पोरेट कर नाही. गेल्या दोन वर्षांत सुमारे ३० श्रीमंत भारतीयांनी येथे नागरिकत्व मिळवले आहे. (Photo: vanuatuislands/Instagram)
-
वानुआतु कुठे आहे?
वानुआतू प्रजासत्ताक हे दक्षिण प्रशांत महासागरात वसलेले एक बेट राष्ट्र आहे, जे उत्तर ऑस्ट्रेलियापासून सुमारे १,७५० किलोमीटर अंतरावर आहे. (Photo: vanuatuislands/Instagram) -
वानुआतू हा जगातील सर्वात आनंदी देशांपैकी एक आहे. हा देश त्याच्या नैसर्गिक सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे. (Photo: vanuatuislands/Instagram)
-
यासोबतच, वानुआतु हे जगातील सर्वोत्तम स्कूबा डायव्हिंग साइट्सपैकी एक आहे. (छायाचित्र: vanuatuislands/Insta) हेही पाहा- ‘या’ बी-ग्रेड चित्रपटाने केलेली १०० पट कमाई, १९८४ मधील सुपरहिट भयपटाबद्दल जाणून घ्या
ललित मोदींनी वानुआतू देशाचे नागरिकत्व मिळविण्यासाठी किती पैसे दिले? जाणून घ्या…
Lalit Modi Vanuatu citizenship Cost and Country Population: ललित मोदी यांनी वानुआतू या छोट्या देशाचे नागरिकत्व घेतले आहे. अशा परिस्थितीत, या देशाचे नागरिकत्व मिळविण्यासाठी किती पैसे द्यावे लागतात आणि येथील लोकसंख्या किती आहे ते जाणून घेऊया.
Web Title: Vanuatu population the who granted citizenship to lalit modi and how much he paid spl