अपुऱ्या दिवसांच्या, अपुऱ्या वजनाच्या बालकांमध्ये तसेच आनुवंशिक आजारांचा कौटुंबिक इतिहास असलेल्या बालकांमध्ये जन्मजात विकासदोष असण्याचा संभव असतो. अशा बालकांवरील उपचारांसाठी ‘रोटरी क्लब ऑफ पुणे प्राइड’तर्फे दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात ‘बाल विकास केंद्रा’ची सुरुवात करण्यात आली आहे.
रोटरीचे प्रांतपाल डॉ. गिरीश गुणे यांच्या हस्ते रविवारी या केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. मंगेशकर रुग्णालयाचे संचालक डॉ. धनंजय केळकर, बालरोग विभागाचे प्रमुख डॉ. राजन जोशी, या केंद्राचे प्रमुख डॉ. सुनील गोडबोले, प्रकल्पाच्या सूत्रधार डॉ. सई पोळ, रोटरी क्लब ऑफ पुणे प्राइडचे अध्यक्ष शशांक इनामदार या वेळी उपस्थित होते.
जन्मजात विकासदोष असणाऱ्या बालकांच्या आयुष्याची गुणवत्ता दीर्घकालीन दृष्टीने सुधारावी आणि स्वतंत्रपणे जीवन जगण्यासाठी या बालकांना तयार करता यावे यासाठी हे केंद्र काम करणार असल्याचे संस्थेच्या वतीने सांगण्यात आले. आर्थिकदृष्टय़ा दुर्बल घटकांना या केंद्रातील उपचारांत काही सवलतीही मिळू शकणार आहेत.  

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Development center for borned undevelopment childrens by rotary