मेहता पब्लिशिंग हाउसतर्फे संजय बारु यांचे ‘द अॅक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर’ हे बहुचर्चित पुस्तक मराठीमध्ये अनुवादित करण्यात आले आहे. लीना सोहोनी यांनी अनुवाद केलेल्या या पुस्तकाचे १४ जुलै रोजी मूळ लेखक संजय बारु यांच्याच हस्ते प्रकाशन होणार आहे.
एस. एम. जोशी सभागृह येथे सायंकाळी सहा वाजता होणाऱ्या होणाऱ्या कार्यक्रमास माजी सनदी अधिकारी राम प्रधान आणि ज्येष्ठ पत्रकार अनंत दीक्षित उपस्थित राहणार आहेत. संयुक्त पुरोगामी आघाडी (यूपीए) सरकारच्या पहिल्या पाच वर्षांच्या कालखंडात संजय बारु हे पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे माध्यम सल्लागार होते. त्या कालखंडामध्ये पंतप्रधान कार्यालयामध्ये घडलेल्या घडामोडी आणि राजकारणाचे विविध पदर बारु यांनी या पुस्तकाद्वारे उलगडले आहेत. लोकसभा निवडणुकीच्या काळात प्रसिद्ध झालेल्या या पुस्तकाने अल्पावधीतच ७० हजार प्रतींच्या खपाचा उच्चांक गाठला आहे. हे पुस्तक मराठीमध्ये अनुवादित करताना वाक्यरचनांमध्ये बदल करण्यात आला असला, तरी मूळ आशयाला धक्का लावलेला नाही, अशी माहिती अनुवादिका लीना सोहोनी यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.
संग्रहित लेख, दिनांक 5th Jul 2014 रोजी प्रकाशित
द अॅक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर’च्या मराठी अनुवादाचे १४ जुलैला प्रकाशन
मेहता पब्लिशिंग हाउसतर्फे संजय बारु यांचे ‘द अॅक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर’ हे बहुचर्चित पुस्तक मराठीमध्ये अनुवादित करण्यात आले आहे.
First published on: 05-07-2014 at 03:00 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dr manmohan singh sanjaya baru the accidental prime minister