पर्यटनासाठी केरळचा पर्याय निवडणाऱ्या परदेशी पर्यटकांबरोबरच देशी पर्यटकांच्या संख्येतही लक्षणीय वाढ झाली आहे. गेल्या वर्षी केरळला पर्यटनातून तब्बल २१ कोटी रुपयांचा महसूल मिळाला आहे. त्यातही केरळला जाणाऱ्या देशी पर्यटकांमध्येही महाराष्ट्रातील पर्यटकांची संख्या सर्वाधिक आहे.
‘केरला टूरिझम’चे सचिव सुमन बिल्ला यांनी ही माहिती दिली. २०११ मध्ये केरळला जाणाऱ्या परदेशी पर्यटकांची संख्या ७.३३ लाख होती. २०१२ मध्ये ती ७.९४ लाख झाली. तर २०११ साली ९३.८८ लाख देशी पर्यटकांनी केरळला भेट दिली होती. गेल्या वर्षी देशी पर्यटकांची संख्या तब्बल १.०१ कोटी झाली आहे.
सुमन बिल्ला म्हणाले, ‘गेल्या ८-९ वर्षांत झालेल्या पुण्याच्या औद्योगिक विस्तारामुळे पुणे केरळसाठी व्यवसायाच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. या वर्षी केरला टूरिझम अमेरिका आणि जपानमध्येही विस्तार करणार आहे. अमेरिकेहून केरळला पोहोचण्यास सुमारे १० ते १२ तास लागत असल्यामुळे अमेरिकेवर फारसे लक्ष्य केंद्रित करण्यात आले नव्हते. युरोपमध्ये मंदीसदृश परिस्थिती निर्माण झाल्यानंतर संस्थेने अमेरिकेतील विस्ताराचा निर्णय घेतला. पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी केरळमध्ये या वर्षीपासून पाण्यावर उतरणारी विमाने (सी प्लेन) सुरू करण्यात आली आहेत. सध्या असे एक विमान सुरू झाले असून आणखी चार विमाने पावसाळ्यानंतर सुरू होतील.’
केरळमध्ये मोठी ऐतिहासिक ठिकाणे नसल्याची उणीव भरून काढण्यासाठी केरळ पर्यटनातर्फे ‘प्रोजेक्ट मुझिरिस’ हा खास प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. यात केरळमधील मुझिरिस या बंदराचे मसाल्यांच्या व्यापारासंबंधीचे ऐतिहासिक महत्त्व अधोरेखित करण्यात येणार आहे.
संग्रहित लेख, दिनांक 4th Sep 2013 रोजी प्रकाशित
केरळ पर्यटनाच्या तिजोरीत महाराष्ट्राची सर्वाधिक भर!
गेल्या वर्षी केरळला पर्यटनातून तब्बल २१ कोटी रुपयांचा महसूल मिळाला आहे. त्यातही केरळला जाणाऱ्या देशी पर्यटकांमध्येही महाराष्ट्रातील पर्यटकांची संख्या सर्वाधिक आहे.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
First published on: 04-09-2013 at 02:39 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharshtrian visits kerala hugely