रूपवेध प्रतिष्ठानतर्फे ज्येष्ठ रंगकर्मीना देण्यात येणारा ‘तन्वीर सन्मान’ यंदा ज्येष्ठ नाटककार आणि विचारवंत प्रा. गो. पु. देशपांडे यांना मरणोत्तर जाहीर झाला आहे. तसेच ‘तन्वीर नाटय़धर्मी’ पुरस्कार ज्येष्ठ निर्माते वामन पंडित यांना जाहीर झाला आहे.
प्रतिष्ठानच्या विश्वस्त दीपा लागू यांनी पत्रकार परिषदेमध्ये ही माहिती दिली. या वेळी डॉ. श्रीराम लागू उपस्थित होते. तन्वीर पुरस्काराचे यंदाचे दहावे वर्ष आहे. या वर्षीचे पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहेत. पुरस्कार वितरण समारंभ ९ डिसेंबर रोजी कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण नाटय़गृह येथे सायंकाळी ५ वाजता होणार आहे. या वेळी ज्येष्ठ नाटककार सतीश आळेकर आणि डॉ. माया पंडित उपस्थित राहणार आहेत. गो. पु. देशपांडे यांना हा पुरस्कार मरणोत्तर दिला जात असल्यामुळे त्यांच्या वतीने त्यांचे चिरंजीव सुधन्वा देशपांडे हा पुरस्कार स्वीकारतील.
पुरस्कार वितरण समारंभामध्ये गो. पु. देशपांडे लिखित ‘उद्ध्वस्त धर्मशाळा’ या नाटकाचा काही भाग अभिनेते सचिन खेडेकर आणि चंद्रकांत कुलकर्णी सादर करणार आहेत. कार्यक्रमासाठी रसिकांना मोफत प्रवेश असून त्यासाठीच्या प्रवेशिका ६ डिसेंबरपासून नाटय़गृहामध्ये उपलब्ध असतील.
संग्रहित लेख, दिनांक 3rd Dec 2013 रोजी प्रकाशित
‘तन्वीर सन्मान’ गो. पु. देशपांडे यांना जाहीर
रूपवेध प्रतिष्ठानतर्फे ज्येष्ठ रंगकर्मीना देण्यात येणारा ‘तन्वीर सन्मान’ यंदा ज्येष्ठ नाटककार आणि विचारवंत प्रा. गो. पु. देशपांडे यांना मरणोत्तर जाहीर झाला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
First published on: 03-12-2013 at 02:38 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pro g p deshpande honoured by tanveer sanman