तळेगाव दाभाडे येथे गर्दीच्या रस्त्यावर असलेल्या कमला ज्वेलर्स या दुकानावर दहा ते बाराजणांच्या टोळीने शुक्रवारी संध्याकाळी सातच्या सुमारास सशस्त्र दरोडा टाकून मोठय़ा प्रमाणावर दागिन्यांची लूट केली. दरोडेखोरांच्या मारहाणीत दुकानाच्या मालकांपैकी दोघे जखमी झाले. दरोडेखोरांनी दुकानाच्या बाहेर व वाहतूक पोलिसांच्या दिशेने गोळीबारही केला. दरोडेखोरांनी नेमके किती दागिने चोरले याचा तपशील रात्री उशिरापर्यंत मिळू शकला नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, तळेगाव रेल्वे स्थानकाकडे जाणाऱ्या रस्त्यालगतच्या खांडगे आर्केड इमारतीजवळ कमला ज्वेलर्स नावाचे दुकान आहे. संध्याकाळी सातच्या सुमारास दहा ते बारा जणांचे टोळके दुकानात शिरले. इतर दोघे लुटारू पिस्तूल घेऊन दुकानाच्या बाहेर उभे होते. त्यांनी बाहेर हवेत गोळीबार करून दहशत निर्माण केली. आत शिरलेल्या लुटारूंनी दुकानातील मालक व इतरांना मारहाण करण्यास सुरुवात केली. या टोळक्याकडे पिस्तूल व धारदार शस्त्रेही होती. मारहाण करीतच त्यांनी दुकानातील दागिने लुटले. हा प्रकार जवळच असलेल्या वाहतूक पोलिसांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी दुकानाच्या दिशेने धाव घेतली. त्यामुळे लुटारूंनी त्यांच्या दिशेनेही गोळीबार केला व सर्व लुटारू स्थानकाच्या दिशेने पळून गेले.
संग्रहित लेख, दिनांक 3rd Oct 2015 रोजी प्रकाशित
तळेगावात सराफाच्या दुकानावर दरोडा टाकून मोठय़ा प्रमाणावर दागिन्यांची लूट
तळेगाव दाभाडे येथे कमला ज्वेलर्स या दुकानावर दहा ते बाराजणांच्या टोळीने शुक्रवारी संध्याकाळी सशस्त्र दरोडा टाकून मोठय़ा प्रमाणावर दागिन्यांची लूट केली.
Written by दया ठोंबरे
First published on: 03-10-2015 at 03:46 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Talegaon kamala jewelers robbery