पुणे : दहावी उत्तीर्ण झाल्याची बनावट गुणपत्रिका सादर करुन टपाल खात्याची फसवणूक केल्याप्रकरणी फरासखाना पोलिसांनी एका तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल केला. याप्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आलेला २२ वर्षीय तरुण मूळचा अहिल्यानगरमधील पारनेर तालुक्यातील आहे. याबाबत सचिन कामठे (वय ३८, रा. सागर पार्क, वडगाव शेरी) यांनी फरासखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, टपाल खात्याकडून डाकसेवक पदासाठी भरती प्रक्रिया राबविली होती. ग्रामीण डाक सेवक ऑनलाइन भरती महाराष्ट्र सर्कल २०२३ (सायकल ५) परीक्षेत मुळे याने दहावी उत्तीर्ण असल्याबाबतचे बनावट प्रमाणपत्र सादर केले. बनावट प्रमाणाद्वारे त्याने नोकरी मिळवण्याचा प्रयत्न केला. शहर टपाल कार्यालयातील (सिटी पोस्ट) अधिकारी सचिन कामठे यांनी गुणपत्रिकेची पडताळणी केली. तेव्हा गुणपत्रिका बनावट असल्याचे उघडकीस आले. त्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. पोलीस उपनिरीक्षक संतोष गोरे तपास करत आहेत.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Trying to get a job in a post department through fake marksheet a case has been registered against the youth in the case of fraud pune print news rbk 25 ssb