Chicken Sandwich Recipe: प्रत्येक संडेला अनेकांच्या घरी कुठल्या ना कुठल्या तरी नॉनव्हेज पदार्थांची मेजवानी असते. यामध्ये अनेक जण आवर्जून चिकन बनवतात. चिकनपासून बनवलेल्या विविध रेसिपी तुम्ही ट्राय केल्या असतील, त्यामुळे आज आम्ही तुमच्या चिकनची नाश्त्यामध्ये बनवली जाईल अशी सोपी रेसिपी घेऊन आलो आहेत. चिकन सँडविचची ही टेस्टी आणि हेल्दी रेसिपी झटपट बनवून तयार होते, जाणून घेऊया साहित्य आणि कृती…

चिकन सँडविच बनवण्यासाठी साहित्य:

१. २५० ग्रॅम बोनलेस चिकन
२. १ वाटी कांद्याची पात
३. ७-८ लसूण पाकळ्या
४. २ चमचे काळी मिरी पावडर
५. २ मोठे कांदे बारीक चिरलेले
६. २ सिमला मिरची बारीक चिरलेली
७. १ चमचा चिलीफ्लेक्स
८. ४ चमचे मेयोनेज
९. ४ चमचे मस्टर्ड सॉस
१०. १ सँडविच ब्रेड पॅकेट
११. चवीनुसार मीठ

चिकन सँडविच बनवण्यासाची कृती:

हेही वाचा: मुलांसाठी बनवा टेस्टी पनीर पॉपकॉर्न; पटकन नोट करा साहित्य आणि कृती

१. सर्वात आधी चिकन शिजवून घ्या आणि शिजवतानाच त्यामध्ये लसूण, काळी मिरी, मीठ टाका.

२. नंतर शिजलेले चिकन एका प्लेटमध्ये काढून हाताने व्यवस्थित कुस्करून घ्या.

३. आता एका कढईमध्ये बटर गरम करून त्यामध्ये छान कांदा परतून घ्या.

४. कांदा लालसर झाला की त्यामध्ये कांद्याची पात, सिमला मिरची टाकून परतून घ्या.

५. नंतर त्यात कुस्करलेले चिकन टाकून परतून घ्या.

६. आता काळीमिरी पावडर, मीठ, चिली फ्लेक्स टाकून परतून घ्या.

७. काही वेळ परतल्यानंतर त्यामध्ये पाणी टाका आणि हे मिश्रण आटेपर्यंत शिजवून घ्या.

८. आता हे मिश्रण शिजल्यानंतर गॅस बंद करून पूर्ण थंड होऊ द्या.

९. आता एका भांड्यामध्ये मेयोनेज व मस्टर्ड सॉस एकत्र करून घ्या आणि त्यात चिकनचे मिश्रण टाकून एकजीव करा.

१०. आता हे ब्रेड स्लाईसवर लावून सँडविच तव्यावर किंवा सँडविच टोस्टरमध्ये भाजून घ्या.

११. तयार गरमागरम चिकन सँडविच सॉससोबत सर्वांना सर्व्ह करा.