Premium

काहीतरी गोड खाण्याची इच्छा होतेय? मग बनवा आंबा बर्फी, जाणून घ्या अगदी सोपी रेसिपी

उन्हाळ्यामध्ये आंबा बर्फी आवडीने खाल्ली जाते. आंबा बर्फी तयार करण्यासाठी नारळाचा वापर केला जातो.

Mango Barfi
कशी तयार करावी आंबा बर्फी ( Manisha Bharani's Kitchen / youtube)

आंबा बर्फी रेसिपी (Mango Barfi Recipe): उन्हाळा म्हणजे आंब्याचा हंगाम. उन्हाळ्या आंबा खाण्यासारखं दुसरं सुख काही असू शकत नाही. आंब्याच्या हंगामात तुम्ही मनसोक्त आमरस खाल्ला असेलच. याकाळात आंब्याची बर्फी असा पदार्थ आहे जोमोठ्यांसह लहानपर्यंत सर्वांना आंबा बर्फी आवडीने खातात.
गोड आंबा बर्फी तोडात टाकताच सहज विरघळते आणि आंब्याचा गोडावा जीभेवर मागे सोडते. या उन्हाळ्यात तुम्ही घरीच आंब्याची बर्फी तयार करून पाहा.पारंपारिक पद्धतीने ही आंबा बर्फी तयार करणे अगदी सोपे आहे आणि त्यासाठी फार वेळ देखील लागत नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

तुम्ही घरात काही कार्यक्रम असेल तर आंबा बर्फी तयार करून सर्वांचे तोंड गोड करू शकता. चला जाणून घेऊ या आंबा बर्फी कशी तयार करावी

आंबा बर्फीसाठी लागणारे साहित्य

आंब्याच्या फोडी – १ कप
दूध – अर्धा कप
किसलेलं खोबरं -३ कप
वेलची पावडर – १/४ टी स्पून
केसर – १ चिमूटभर
साखर – १ कप (आवश्यकतेनुसार)

हेही वाचा – स्वादिष्ट आणि कुरकुरीत सुरणाचे काप, जेवणासोबत लावा तोंडी! अगदी झटपट होतात तयार, ही घ्या रेसिपी

आंबा बर्फी तयार करण्याची पद्धत

आंबा बर्फी तयार करण्यासाठी सर्वात आधी आंबा कापून घ्या आणि त्याच्या फोडींचे तुकडे करून एका भांड्यात काढा.

आता एका ब्लेंडरमध्ये आंब्याचे तुकडे आणि अर्धा कप दूध टाकून ते ब्लेंड करून घ्या. आंब्याची मऊ प्युरी तयार झाली पाहिजे याकडे लक्ष द्या. गरजेनुसार त्यात थोडसे दूध टाकू शकता.

आता एक कढई गॅसवर गरम करण्यासाठी ठेवा त्यात आंब्याची प्युरी टाकून मध्यम आचेवर शिजू द्या.

काही वेळाने त्या प्युरीमध्ये एक कप साखर टाका आणि प्युरीमध्ये साखर पूर्णपणे विरघळेपर्यंत चमच्याने हलवत राहा. यामध्ये ३ कप किसेलेलं खोबरं टाका आणि शिजवा.

दरम्यान, छोट्या वाटीत थोडे कोमट दूध घ्या आणि त्यामध्ये केसर टाकून ठेवा. आता केसरवाले दूध कढईमध्ये टाकून प्यूरीमध्ये व्यवस्थित मिसळू द्या.

हेही वाचा- केळ आणि कॉफीपासून तयार केलेला केक खाऊन पाहाल तर, चॉकलेट-व्हॅनिला केक खाणे विसराल

आता मिश्रण साधारण १० मिनिटांपर्यंत शिजू द्या आणि चांगले घट्ट होऊ द्या . मिश्रण तयार होण्यासाठी १५-२० मिनिटे वेळ लागू शकतो. जेव्हा मिश्रण व्यवस्थित शिजेल तेव्हा त्या वेलची पावडर टाकून गॅस बंद करा.

त्यानंतर एका ताटलीला थोडे तूप लावून घ्या. त्यात तयार मिश्रण टाकून समानरितीने पसरवा. आता मिश्रण सेट होण्यासाठी अर्धातास तसेच ठेवा. आता सेट झालेले मिश्रण चाकूने बर्फीच्या आकारामध्ये कापा. चविष्ट आंबा बर्फी तयार आहे.

आंबा बर्फी तुम्ही हवाबंद डब्यात आंबा बर्फी ठेवू शकता.

मराठीतील सर्व रेसिपी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: How to make delicious mango barfi snk

First published on: 13-05-2023 at 10:30 IST
Next Story
शोध आठवणीतल्या चवींचा! : नुसतं तिखटजाळ नव्हे.. चविष्ट!