सकाळी नाश्ता करायचे म्हटले की आपल्याकडे सहसा पोहे किंवा रव्याचे उपीट बनवले जाते. रोज तेच तेच पदार्थ खाऊन कंटाळा येतो पण रोज काहीतरी चमचमीत बनवायला बऱ्याचदा वेळही नसतो. अशा वेळी तुमच्या रोजच्या नाश्त्याला थोडा ट्विस्ट देऊ शकता. तुम्ही रव्या ऐवजी ज्वारीच्या पीठाचे उपीट बनवू शकता. हा पदार्थ स्वादिष्ट आहेच पण त्याचबरोबर आरोग्यासाठी देखील अत्यंत पौष्टिक आहे. जे आरोग्याची काळजी घेण्यासाठी आरोग्यदायी पर्याय शोधत असतात त्यांच्यासाठी हा उत्तम पर्याय आहे. विशेष म्हणजे हा पदार्थ झटपट तयार होतो. चला मग जाणून घेऊ या ज्वारीच्या पीठाचे उपीट कसे बनवावे?

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ज्वारीच्या पीठाचे उपीट/ उपमा रेसीपी

साहित्य
तेल
मोहरी
जिरे
ज्वारीचे पीठ
कांदा
शेंगदाणे
हळद
कोथिंबीर
कडीपत्ता,
मीठ
फुटाना डाळ

कृती

प्रथम एका कढईत ज्वारीचे पीठ भाजून घ्या. त्यानंतर कढईत तेल गरम करून, जिरे- मोहरी टाका. मोहरी तडतडली की मग त्यात मिरची, कांदा, शेंगदाणे हळद टाकून परतून घ्या, कडीपत्ती टाका. त्यात पांढरी फुटाना डाळ टाका, मीठ कोथिंबीर टाका १ ग्लास पाणी टाकून उकळी येऊ द्या मग त्यात भाजलेले ज्वारीचे पीठ टाका. एक वाफ येऊ द्या. गरम गरम ज्वारीटे उपीठ खा.

ही रेसिपी इंस्टाग्रामवर savitakitchenqueen नावाच्या पेजवर पोस्ट केली आहे. तुम्ही ही रेसिपी स्वत: बनवून पाहू शकता.

मराठीतील सर्व रेसिपी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: How to make sorghum flour upit or jwarihya pithache upit for breakfast note the nutritious and delicious recipe snk