तुम्ही कढी आवडते का? आवडत असेल तर तुमच्यासाठी आमच्याकडे एक सोपी रेसिपी आहे. आज आम्ही तुम्हाला कढी पकोडा रेसिपी सांगणार आहोत. आंबट-तिखट कढी पकोडा अत्यंत स्वादिष्ट असतो आणि बनवायला देखील ही रेसिपी अतिशय सोपी आहे. तुम्हाला ही रेसिपी नक्की आवडेल. चला जाणून घेऊ या सोपी रेसिपी

कढी पकोडा रेसिपी

  • साहित्य :-
  • २ कप बेसन
  • १/२ कप बारीक चिरलेला कांदा
  • ६ बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या
  • १ लहान चमचा लाल तिखट
  • मीठ चवीनुसार
  • २ मोठे चमचे तेल
  • पकोडे तळण्यासाठी आणखी वेगळं तेल
  • ५ कप आंबट दही
  • ६ मोठे चमचे बेसन
  • १ लहान चमचा मोहरी
  • १/२ लहान चमचा हळदपूड
  • ६ उभ्या चिरलेल्या हिरव्या मिरचा
  • १ इंच बारिक चिरलेला आल्याचा तुकडा
  • चिमूटभर हिंग
  • ४ कप गरम पाणी
  • मीठ चवीनुसार

हेही वाचा – बटाटा मुसल्लम खाल्लाय का? नसेल तर जाणून घ्या तरला दलाल यांची खास रेसिपी

  • सजावटीसाठी साहित्य :
  • १ लहान चमचा तेल
  • २ अख्ख्या लाल मिरच्या

हेही वाचा – बटाट्याच्या चकत्या खाऊन कंटाळलात? काहीतरी नवीन पाहिजे मग, खाऊन पाहा स्वादिष्ट अन् कुरकुरीत बटाटा फ्राय

कृती

  • कढी बनवण्यासाठी दह्यामध्ये बेसन व पाणी घालून मिश्रण मिक्सरने एकजीव करुन घ्या.
  • एका मोठ्या पातेल्यात तेल गरम करुन त्यामध्ये मोहरी, हिंगाची फोडणी घाला. मग त्यामध्ये आलं, हिरव्या मिरच्या व हळद घाला.
  • त्यानंतर दही-बेसनाचं मिश्रण व मीठ घाला. मोठ्या आचेवर मिश्राण उकळा. मग आच कमी करा. जवळपास १५ मिनिटं मंद आचेवर मिश्रण घट्ट होईपर्यंत शिजवा.
  • आता पकोड्यांसाठी बेसनमध्ये पाणी घालून घट्ट भजीसारखं पीठ तयार करा व ते व्यवस्थित फेटा.
  • यामध्ये चिरलेला कांदा, हिरव्या मिरच्या, लाल तिखट, मीठ व गरम तेल घाला. पुन्हा एकदा फेटा. मग गरम तेलात याचे पकोडे तयार करा.
  • शिजलेल्या कढीमध्ये पकोडे टाका व ५ मिनिटं आणखी मंद आचेवर शिजू द्या. यानंतर सर्व्हींग बाऊलमध्ये कढी ओता.
  • एक चमचा तेल गरम करुन त्यामध्ये लाल मिरची परता व ही फोडणी कढीवर ओता.
  • ही कढी दिसायलाही छान दिसते.