Gulpapadi Ladoo: भुक लागल्यावर अनेकदा आपण मॅगी, पास्ता, वेफर्स असे अनहेल्दी फास्ट फूड खातो. पण हे पदार्थ सतत खाणं आरोग्यासाठी घातक ठरु शकतं. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला चविष्ट आणि पौष्टिक गुळपापडीचे लाडू कसे बनवायचे हे सांगणार आहोत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गुळपापडीचे लाडू बनवण्यासाठी लागणारे साहित्य:

१. २ वाटी जाड कणीक
२. २ वाटी गूळ
३. साजूक तूप आवश्यकतेनुसार
४. २ चमचे वेलची पूड
५. मीठ चवीनुसार

गुळपापडीचे लाडू बनवण्याची कृती:

१. सर्वात आधी गव्हाचे जाड रवाळ पीठ तुपावर खरपूस भाजून घ्या.

२. त्यानंतर भाजलेले पीठ एका ताटात काढून घ्या.

३. आता त्याच कढईत बारीक किसलेला गूळ घालून वितळवावा आणि त्यात भाजलेले पीठ घालून मिक्स करा.

४. आता त्यावर वेलदोड्यांची पूड आणि चवीनुसार मीठ घाला.

हेही वाचा: झटपट बनवा पौष्टिक आणि चटपटीत मूग डाळीची भजी; पटकन नोट करा साहित्य आणि कृती

५. हे सर्व मिश्रण एकजीव झाल्यावर ते गॅसवरुन उतरवावे आणि पीठ कोमट झाल्यावर त्याचे लाडू वळून घ्या.

६. तयार गुळपापडीच्या लाडवांचा आस्वाद घ्या.

मराठीतील सर्व रेसिपी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Make gulpapadi ladoo in just 15 minutes quickly note ingredients and recipes sap