Dates Modak Recipe: बाप्पाच्या प्रसादासाठी विविध प्रकारचे गोड पदार्थ बनविले जातात. त्यात गव्हाच्या, तांदळाच्या उकडीचे मोदक घरोघरी आवर्जून बनवले जातात. पण, आज आम्ही तुम्हाला खजूराचे मोदक कसा बनवायचा हे सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया साहित्य आणि कृती

खजूराचे मोदक बनवण्यासाठी लागणारे साहित्य:

  • २ वाटी खजूर
  • २ चमचे तूप
  • २ वाटी खोबरं
  • २ वाटी काजू-बदाम-पिस्ता

खजूराचे मोदक बनवण्याची कृती:

हेही वाचा: बाप्पासाठी ड्रायफ्रूट्सचा पौष्टिक मोदक; पटकन नोट करा साहित्य आणि कृती

  • सर्वप्रथम खजूराच्या बिया काढून मिक्सरमधून खजूर वाटून त्याची चांगली पेस्ट बनवा.
  • आता एका पॅनमध्ये तूप घालून त्यात खजूर, खोबरं, ड्रायफ्रुटस घालून सर्व मिश्रण एकजीव करून करा.
  • आता या मिश्रणावर तूप घालून, मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्या.
  • आता मिश्रण एका ताटात काढून साचाच्या मदतीने त्याचे मोदक तयार करा.
  • तयार खजूराचे मोदक बाप्पाला नैवेद्य दाखवून सर्वांना सर्व्ह करा.