Potato Cutlet Recipe: संध्याकाळी मुलं शाळेतून आली की, त्यांना कोणता पदार्थ खाऊ घालावा असा प्रश्न अनेक महिलांना पडतो. रोज रोज तेच पदार्थ खाऊन मुलंही कंटाळतात. अशावेळी तुम्ही त्यांच्यासाठी चविष्ट बटाटा कटलेट नक्कीच ट्राय करू शकता. चला तर मग जाणून घेऊया बटाटा कटलेटची सोपी रेसिपी…

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

चविष्ट बटाट्याचे कटलेट बनवण्यासाठी लागणारे साहित्य:

  • ३-४ उकडलेले बटाटे
  • १ कप किसलेला कोबी
  • २ चमचे मैदा
  • १ चमचा लाल लिखट
  • १/२ चमचा हळद
  • १/२ चमचा धणे पूड
  • १/२ चमचा जिरे पूड
  • ३ चमचे तांदळाचे पीठ
  • बारीक चिरलेली कोथिंबीर
  • ब्रेड क्रम्प्स
  • तेल आवश्यकतेनुसार
  • मीठ चवीनुसार

चविष्ट बटाट्याचे कटलेट बनवण्याची कृती:

  • सर्वप्रथम एका भांड्यामध्ये किसलेला कोबी घ्यावा.
  • त्यानंतर त्यात उकडलेले बटाटे स्मॅश करावे.
  • आता त्यात लाल तिखट, हळद, धणे-जिरे पूड, गरम मसाला, तांदळाचे पीठ, कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ घालून एकजीव करून त्याचा गोळा करून घ्यावा.
  • आता तयार पीठाचे गोल आकाराचे कटलेट बनवून घ्यावे.
  • तयार कटलेट मैद्याच्या मिश्रणात घोळवून नंतर कटलेट ब्रेड क्रम्प्समध्ये घोळवून डिप फ्राय करून तळून घ्यावे.
  • तयार बटाटा कटलेट सॉसबरोबर सर्व्ह करावे.
मराठीतील सर्व रेसिपी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Make tasty recipe of potato cutlet sap