Matar uttapam: उन्हाळ्याच्या दिवसात मुलांसाठी दररोज काय बनवायचं, हा प्रश्न अनेक महिलांना सतावतो. नवीन पदार्थासोबतच मुलांसाठी तो पौष्टिक असणंदेखील खूप गरेजचं आहे. अशावेळी तुम्ही मटार उत्तपा ट्राय करू शकता. ही रेसिपी बनवायला एकदम सोपी आणि टेस्टी आहे. चला तर जाणून घेऊया साहित्य आणि कृती…

मटार उत्तपा बनवण्यासाठी साहित्य :

१. २-३ कप मटार दाणे
२. २ वाटी रवा
३. ४-५ हिरव्या मिरच्या
४. ३ मोठे चमचे दही
५. १ छोटा चमचा बेकिंग सोडा
६. २ वाटी बारीक चिरलेले टॉमेटो
७. कोथिंबीर
८. आलं
९. चवीपुरते मीठ

मटार उत्तपा बनवण्यासाठी कृती :

हेही वाचा: कलिंगड खाऊन खाऊन कंटाळलात? मग बवना कलिंगडाचे टेस्टी थालीपीठ; नोट करा साहित्य अन् कृती

१. सर्वात आधी मटार दाणे, आलं, हिरव्या मिरच्या एकत्र मिक्सरमध्ये वाटून घ्या.

२. आता हे वाटण भांड्यात काढून त्यात रवा, दही, टोमॅटो, मीठ, कोथिंबीर घालून मिक्स करून घ्या.

३. त्यानंतर हे मिश्रण १०-१५ मिनिटांसाठी झाकून ठेवा. जर मिश्रण घट्ट असल्यास त्यात थोडेसे पाणी घाला.

४. आता त्यात एक छोटा चमचा बेकिंग सोडा घालून मिश्रण एकजीव करा.

५. त्यानंतर गरम तव्यावर उत्तप्याचे मिश्रण टाका आणि त्यावर झाकण ठेवून गॅस मध्यम आचेवर ठेवा.

६. आता त्यावर तेल टाकून उत्तपा पलटून घ्या आणि परत झाकण ठेवा. दोन मिनिटांनी उत्तपा काढून घ्या.

७. तयार गरमागरम मटार उत्तपे खोबऱ्याच्या चटणीबरोबर सर्व्ह करा.