Ragi Upma Recipe: आजपर्यंत तुम्ही रव्याचा उपमा, ओट्सचा उपमा नक्की खाल्ला असेल. पण आज आम्ही तुम्हाला नाचणीचा पौष्टिक उपमा कसा बनवायचा हे सांगणार आहोत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नाचणीचा उपमा बनवण्यासाठी लागणारे साहित्य:

  • २ वाटी नाचणीचे पीठ
  • ६-७ बारीक चिरलेल्या मिरच्या
  • १ बारीक चिरलेला कांदा
  • १ छोटा चमचा जिरे
  • १ छोटा चमचा मोहरी
  • १ छोटा चमचा हळद
  • ७-८ कढीपत्त्याची पाने
  • कोथिंबीर
  • मीठ चवीनुसार
  • तेल आवश्यकतेनुसार

नाचणीचा उपमा बनवण्याची कृती :

हेही वाचा:फक्त १० मिनिटांत बनवा पौष्टिक लाडू; पटकन वाचा साहित्य आणि कृती

  • सर्वात आधी नाचणीला काही वेळ भिजवून मोड आणून वाफवून घ्या.
  • त्यानंतर कढईत तेल गरम करून त्यात जिरे, मोहरी, कांदा, मिरची, कढीपत्ता घाला.
  • आता त्यामध्ये शिजवलेली नाचणी घालून त्यावर पाणी आणि चवीनुसार मीठ घाला.
  • काही मिनिट हा उपमा परतून घ्या आणि त्यावर कोथिंबीर घालून गरमागरम सर्व्ह करा.
मराठीतील सर्व रेसिपी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ragi upma recipe make a nutritious ragi upma for breakfast sap