Wheat Naankatai Recipe: चहाबरोबर अनेकांना खारी, बिस्किट्स, नानकटाई खायला आवडतात. पण, बाजारातील मैद्यापासून बनवलेली नानकटाई आरोग्यासाठी फारसे योग्य मानले जात नाहीत. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला गव्हाची पौष्टिक नानकटाई कशी बनवायची हे सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया साहित्य आणि कृती… गव्हाची नानकटाई करण्याची कृती: (Wheat Naankatai Recipe) १ वाटी गव्हाचे पीठ १/२ वाटी तूप १/२ वाटी पिठीसाखर ३ चमचे डेसीनेट कोकोनट ३ चमचा टुटीफ्रुटी हेही वाचा: Butter Naan Recipes: ‘या’ सोप्या पद्धतीने बनवा हॉटेलसारखे ‘बटर नान’; पटकन नोट करा साहित्य आणि कृती गव्हाची नानकटाई करण्यासाठी लागणारे साहित्य: सर्वप्रथम एका भांड्यात पिठीसाखर आणि तूप मिक्स करून घ्या. हे मिश्रण व्यवस्थित मिक्स झाल्यावर त्यामध्ये गव्हाचे पीठ घाला आणि मळून घ्या. कणिक मळून झाल्यावर त्याचे छोटे छोटे गोळे करून घ्या आणि नानकटाईला हवा तो आकार द्या. त्यानंतर नानकटाईला डेसीनेट कोकोनट लावून घ्या. आता इडली पात्राच्या तळाला मीठ टाकून काही वेळ गरम करण्यासाठी ठेवा. त्यानंतर इडलीच्या साचाला तूप लावून घ्या आणि त्यावर नानकटाई ठेवा.यावेळी गॅस मंद आचेवर असायला हवा. १०-२० वीस मिनिट नानकटाई बेक करून घ्यावी, त्यानंतर गॅस बंद करावा. तयार गव्हाच्या नानकटाईचा आस्वाद घ्या.