नाश्ता हा दिवस सुरु करण्यासाठी सर्वात महत्त्वाचा आहार मानला जातो. नाश्ता न करणे आरोग्यासाठी चांगले नाही. थोडसा का असेना पण नाश्ता केल्याशिवाय घराबाहेर जाऊ नये. जर तुम्हाला ऑफिस, कॉलेज किंवा इतर कोणत्या कामासाठी बाहेर जायची घाई असेल तर तुम्ही १० मिनिटांत तयार होईल असे काहीतरी बनवून खाऊ शकता. नाश्त्यामध्ये भरपूर पोषणमुल्य असेल तर तुमच्या शरीरात दिवसभर काम करण्यासाठी उर्जा राहील आणि थकावट जाणवणार नाही. जर तुम्हाला अशाच एका हेल्दी रेसिपीच्या शोधात असाल जी चविष्ट असण्यासोबत आरोग्यासाठी देखील लाभादायी असेल तर आमच्याकडे एक पर्याय आहे. तुम्ही पालक स्मुदी किंवा ग्रीन स्मुदी नाश्त्यासाठी बनवू शकता. तुम्हाला हेल्दी राहायला आवडतं असेल तर तुम्ही आहारामध्ये पालक आणि केळ वापरून तयार केलेल्या स्मुदीचा समावेश करू शकता. उन्हाळा सुरू झाला आहे अशा परिस्थितीत तुम्ही तुमच्या आहारात अशा काही गोष्टींचा समावेश करावा, ज्यामुळे तुमच्या शरीराला थंडावा मिळेल आणि तंदुरुस्त राहाल. पालक स्मूदी म्हणजेच ग्रीन स्मुदी ही अशीच रेसिपी आहे. त्यात साखरही टाकलेली नाही. ते १० ते १५ मिनिटांत तयार होते. तुम्ही ते ऑफिसमध्ये घेऊन जाऊ शकता. चला जाणून घेऊ या पालक किंवा ग्रीन स्मूदी कसा बनवावी. पालक स्मूदी रेसिपी साहित्य - अर्धा जुडी पालक, दोन विड्याची पाने, पुदिना, एक केळे, दालचिनी पावडर चवीप्रमाणे, किंचित मीठ कृती - पालक आणि विड्याची पाने स्वच्छ धुवून घ्या. वरील सर्व साहित्य मिक्सरमध्ये एकजीव करून घ्या. आवश्यकता वाटल्यास किंचित पाणी घाला. स्मुदी तयार.