Festive snack dhokla: सणासुदीचा काळ सुरू झाला की घराघरांत पक्वान्नांची मेजवानी खायला मिळते. नातेवाईक, मित्रमंडळींची ये-जा वाढते आणि घरभर चविष्ट पदार्थांचा सुगंध दरवळू लागतो. अशा वेळी नाश्त्यासाठी पटकन तयार करता येईल आणि सगळ्यांना आवडणारा एक लोकप्रिय पदार्थ म्हणजे ढोकळा. गुजरातमधून आलेला हा हलका, फुलका आणि चविष्ट पदार्थ आता सगळ्यांच्याच घरात बनवला जातो. पण, जर तुम्हाला नेहमीच्या बेसनच्या ढोकळ्याचा स्वाद कंटाळवाणा वाटू लागला असेल, तर या सणासुदीत काही हटके प्रकार जरूर ट्राय करा. चला तर पाहूया ७ वेगळ्या ढोकळ्यांच्या रेसिपीज, ज्या सणांच्या स्नॅक्ससाठी परफेक्ट ठरतील.
१. सॅंडविच ढोकळा
नाश्त्यासाठी हा एकदम भन्नाट पर्याय आहे. यात ढोकळ्याच्या दोन थरांमध्ये मसालेदार मिश्रणाचा थर लावला जातो. वरून थोडी कोथिंबीर आणि लिंबाचा रस टाकून हा सॅंडविच ढोकळा खूपच स्वादिष्ट लागतो.
२. पनीर ढोकळा
प्रोटीनने भरपूर असलेल्या पनीरचा वापर करून बनवलेला हा ढोकळा मऊ आणि पौष्टिक असतो. यात ढोकळ्याच्या बॅटरमध्ये पनीरचे छोटे तुकडे टाकले जातात आणि वरूनही पनीरने गार्निश केलं जातं.
३. बीटरूट ढोकळा
रंग आणि चवीने वेगळा अनुभव घ्यायचा असेल तर बीटरूटचा ढोकळा नक्की ट्राय करा. ढोकळ्याच्या मिश्रणात बीटरूटची प्युरी मिसळल्याने त्याला सुंदर गुलाबी रंग येतो आणि पौष्टिकतेतही वाढ होते.
४. मूग डाळ ढोकळा
मूग डाळीपासून बनवलेला हा ढोकळा प्रोटीनने समृद्ध आहे. मूग डाळीचं मिश्रण आंबवून तयार केलेला हा प्रकार हलका आणि पचनास सोपा असतो.
५. रवा ढोकळा
सूजी म्हणजेच रव्यापासून झटपट तयार होणारा हा ढोकळा खूपच स्पंजी आणि मऊसर लागतो. यात दही आणि बेकिंग सोड्याचा वापर करून त्याला उत्तम टेक्स्चर दिलं जातं.
६. तांदूळ आणि उडद डाळ ढोकळा
इडलीसारख्या पिठापासून तयार होणारा हा ढोकळा चवीला वेगळा लागतो. तांदूळ आणि उडद डाळ भिजवून त्याचं बॅटर तयार करून हा ढोकळा वाफवला जातो.
७. खमण ढोकळा
हा पारंपरिक आणि सर्वाधिक लोकप्रिय प्रकार आहे. बेसनाचं मिश्रण आंबवून वाफवून तयार केलेल्या या ढोकळ्यावर सरसों, हिंग आणि हिरवी मिरची यांचा तडका दिला जातो.
८. पालक ढोकळा
आरोग्यदायी पर्याय हवा असेल तर पालकाचा ढोकळा उत्तम. पालकाची प्युरी ढोकळ्याच्या मिश्रणात मिसळल्याने रंग, चव आणि पौष्टिकता तीनही गोष्टी वाढतात.
या सगळ्या ढोकळा रेसिपीज सणासुदीच्या स्नॅक्ससाठी अगदी परफेक्ट आहेत. हलके, चविष्ट आणि पौष्टिक असा हा ढोकळा पदार्थ प्रत्येकाचं मन जिंकेल!