Tender Coconut Recipes Video: उन्हाळा,पावसाळा, हिवाळा कोणत्याही सीझनमध्ये आईस्क्रीमला नाही म्हणणे होतच नाही. काही भागात ऊन- पावसाचा खेळ सध्या सुरु असला तरी वाढलेला तापमानाचा पारा आणि उकाडा काही कमी झालेला नाही. अशावेळी एखाद्या जेवणानंतर छान वाटीभर आईस्क्रीम खाऊन शरीराला थंडावा आणि जिभेला मस्त मेजवानी देता येते, आता यासाठी बाहेरून आईस्कीम आणणं म्हणजेच चांगलाच शे- दोनशे रुपयांना फटका. हो ना? काहींना ते शक्य असलं तरी असा एखादा बाहेरच खाण्याचा पदार्थ घरी करून पाहावा अशीही अनेकांची इच्छा असते. आता असा पदार्थ बनवण्याचं तुमचं कारण काहीही असो पण त्यासाठी लागणारा वेळ व कष्ट कमी करण्याचे काम आम्ही करणार आहोत.

इंस्टाग्रामवर सध्या व्हायरल होणारी एक कमाल टेंडर कोकोनट म्हणजेच खोबऱ्याच्या फ्लेव्हरचे आईस्क्रीम कसे बनवायचे हे आज आपण पाहणार आहोत. यासाठी तुम्हाला मोजून पाच ते सहा गोष्टी लागू शकतात. चला पाहूया…

टेंडर कोकोनट आईस्क्रीम साहित्य (Tender Coconut Recipe Ingredients)

  • फ्रेश नारळाची मलाई
  • फ्रेश क्रीम
  • मिल्क पावडर
  • व्हॅनिला एक्सट्रॅक्ट
  • नारळाचं दूध
  • पिठीसाखर

टेंडर कोकोनट आईस्क्रीम कृती (Tender Coconut Recipe)

नारळाची मलाई आणि नारळाचं दूध मिक्सरला छान वाटून घ्या. यात पाणी घालू नका. मग एका ब्लेंडरमध्ये मिल्क पावडर, पिठीसाखर, व्हॅनिला एक्क्सट्रॅक्टचे काही थेंब आणि आपण मलाई व दुधाची वाटलेली पेस्ट घाला यात फ्रेश क्रीम सुद्धा टाका आणि मग एकदा छान मिक्सरला लावून घ्या. एक डब्बा घ्या यात तयार आईस्क्रीम ओतून छान सेट करून घ्या व यामध्ये ओल्या खोबऱ्याचे बारीक तुकडे घाला. साधारण ८ ते १० तास हे आईस्क्रीम सेट होऊ द्या.

हे ही वाचा<< रात्री कडधान्य भिजवायला विसरलात? आयत्या वेळी मास्टरशेफच्या ‘या’ ५ टिप्स वाचवतील वेळ व पैसे

तुम्हीही ही रेसिपी नक्की करून पाहा आणि कशी होते हे कमेंट करून नक्की कळवा.