तुम्ही कधी सुरण खाले आहे का? नसेल खाले तर एकदा नक्की खाऊन बघा. सुरण आरोग्यासाठी फायदेशीर तर आहेत पण चवीला देखील उत्तम आहे. सुरणाचे अनेक पदार्थ तयार केले जातात, सुरणाची बटाट्यासारखी भाजी देखील केली जाते. तुम्ही जर पहिल्यांदा सुरण खाणार असाल तर आम्ही सांगितलेली रेसिपी तुम्ही खाऊन पाहा. तुम्हाला सुरण तर आवडेलच पण तुम्हाला एक कमाल पदार्थ देखील खायला मिळेल. हा पदार्थ आहे सुरणाचे काप. सुरणाचे काप कुरकुरीत आणि अतिशय चविष्ट असतात. तुम्ही सुरणाचे काप जेवताना तोंडी लावू शकता. चला तर मग जाणून घेऊ या कसे तयार करावे सुरणाचे काप.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सुरणाचे काप रेसिपी

सुरणाचे काप तयार करण्यासाठी लागणारे साहित्य
सुरण – ४०० ग्रॅम

मीठ
हळद – १/४
धने पावडर – १/२
लाल मिरची पावडर – १ (चवीनुसार)
आले लसूण पेस्ट – १चमचा
चिंचेचा कोळ किंवा कोकम आगळ – २ चमचे

हेही वाचा- झटपट बनवा स्वादिष्ट पालक भात, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडेल ही हटके रेसिपी

रव्याचे मिश्रणासाठी लागणारे साहित्य

रवा – १ कप
तांदळाचे पीठ – १ कप
मीठ ( चवीनुसार)
मिरची पावडर – १ चमचा
जीरे पूड- १ चमचा
तळण्यासाठी तेल

हेही वाचा – अंडा घोटाळा- नावाप्रमाणे अगदी हटके रेसिपी, एकदा नक्की खाऊन पाहा

सुरणाचे काप तयार करण्याची कृती
सुरण हातळण्यापूर्वी हाताळा तेल किंवा कोकम लावून घ्यावे किंवा प्लॅस्टिक किंवा रबरी हाजमोजे घालावे. त्यानंतर सुरण सोलून घेऊन त्याचे मोठे चौकोनी काप करावे. पाण्यात आमसूल घालून कोळून घ्यावे आणि त्यामध्ये २ तास सुरण ठेवावे.

मीठ, हळद, धने पावडर, लाल मिरची पावडर,आले लसूण पेस्ट, चिंचेचा कोळ किंवा कोकम आगळ हे सर्व मिश्रण एकत्र करावे. सुरणाचे पातळ काप करून , कापडाने पुसूरन घ्या. तयार मिश्रण प्रत्येक कापावर लावावे. एका ताटलीत बाजूला ठेवावे.

त्यानंतर रव्याचे मिश्रण तयार करण्यासाठी रवा, तांदळाटे पीठ. जिरेपूड, लाल तिखट आणि मीठ एकत्र करुन घ्यावे. आता बाजूला ठेवलेले काप रव्याच्या मिश्रणात घोळवून घ्यावे आणि तव्यावर तेल गरम करुन शॅलो फ्राय करावे. गरमा गरम सर्व्ह करावे. सुरणाचे काप जेवणासोबत तोंडी लावण्यासाठी खाल्ले जातात.

मराठीतील सर्व रेसिपी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Yummy and crispy surna slices get ready in no time not this surnache kaap recipe snk