अपघात टाळण्यात अँटीलॉक ब्रेकिंग सिस्टीम निभावते महत्त्वाची भूमिका; जाणून घ्या कसे करते काम

ABS म्हणजेच अँटीलॉक ब्रेकिंग सिस्टीमचा शोध जवळपास ५० वर्षांपूर्वी लागला आहे परंतु भारतीय ऑटोमोटिव्ह इंडस्ट्रीमध्ये नुकतीच ही सिस्टिम अनिवार्य करण्यात आली आहे. पहिल्यांदा एबीएसचा शोध १९२०च्या दशकात लागला होता आणि १९९० पर्यंत हे बऱ्याच कारमध्ये लोकप्रिय झाले होते. आजच्या काळात जवळपास सर्वच कारमध्ये हे फीचर समाविष्ट असते. परंतु तुम्हाला माहित आहे का हे फीचर कसे […]

ABS Pexels
आजच्या काळात जवळपास सर्वच कारमध्ये हे फीचर समाविष्ट असते. (Photo : Pexels)

ABS म्हणजेच अँटीलॉक ब्रेकिंग सिस्टीमचा शोध जवळपास ५० वर्षांपूर्वी लागला आहे परंतु भारतीय ऑटोमोटिव्ह इंडस्ट्रीमध्ये नुकतीच ही सिस्टिम अनिवार्य करण्यात आली आहे. पहिल्यांदा एबीएसचा शोध १९२०च्या दशकात लागला होता आणि १९९० पर्यंत हे बऱ्याच कारमध्ये लोकप्रिय झाले होते. आजच्या काळात जवळपास सर्वच कारमध्ये हे फीचर समाविष्ट असते. परंतु तुम्हाला माहित आहे का हे फीचर कसे काम करते? जर नाही, तर या लेखामध्ये आपण जाणून घेऊया एबीएस म्हणजेच अँटीलॉक ब्रेकिंग सिस्टीम कसे काम करते.

चाक जॅम होण्यापासून रोखते

एबीएस हे देखील आधुनिक तंत्रज्ञानाचे एक उत्तम उदाहरण आहे. याच्या मदतीने अनेक लोक अपघातात जीव गमावण्यापासून वाचले आहेत. जेव्हा ब्रेक जोरात दाबला जातो तेव्हा एबीएस कारच्या चाकांना लॉक होण्यापासून प्रतिबंधित करते. एबीएसमध्ये सेन्सर्स बसवलेले असतात, जेव्हा त्यांना चाक जाम झाल्याचे जाणवते तेव्हा ते चाकांवरचे ब्रेक क्षणभर कमी करतात. यामुळे आपली कार नियंत्रणात राहते आणि घसरत नाही. जेव्हा हे काम करत असते तेव्हा ब्रेक पेडलवर तुम्हाला हालचाल जाणवते.

सामान्य कारचे इलेक्ट्रिक कारमध्ये रूपांतर करणे शक्य? जाणून घ्या किती येईल खर्च

एबीएस कार्यरत आहे की नाही हे कसे जाणून घ्यावे

जर तुमच्या कारचा एबीएस काम करत नसेल तर ब्रेकमध्ये काही अन्य समस्या जाणवू शकतात. जर तुम्ही वेगाने ब्रेक मारत असाल आणि गाडी थांबत नसेल तर ही धोक्याची घंटा आहे. अशा परिस्थितीत गाडी चालवणे टाळा आणि ती थेट मेकॅनिककडे घेऊन जा. एबीएस काम करत आहे की नाही हे जाणून घ्यायची सोपी पद्धत म्हणजे, एबीएस काम करत नसेल, तर कारच्या केबिनमधील एबीएस लाइट पेटते. याशिवाय, जर तुमची कार जोरदार ब्रेकवर धक्के मारत थांबली किंवा घसरली तर समजून घ्या की एबीएस काम करत नाही. ब्रेकिंग करताना कोणताही विचित्र आवाज ऐकू येत असल्यास किंवा ब्रेक मारण्यासाठी अधिक शक्ती लागल्यास, त्वरित कार मेकॅनिककडे घेऊन जावी.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान ( Tech ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Abs play an important role in preventing accidents learn how it works pvp

Next Story
मोबाईल हरवला किंवा चोरीला गेलाय? CEIR वर असं करू शकता ब्लॉक; काय असतं KYM? जाणून घ्या
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी