Airtel ने लाँच केले 'हे' दोन प्रीपेड प्लॅन्स, मिळणार 'इतका' जीबी हाय स्पीड डेटा | airtel launched two prepaid plans in 60 gb high speed data will available | Loksatta

Airtel ने लाँच केले ‘हे’ दोन प्रीपेड प्लॅन्स, मिळणार ‘इतका’ जीबी हाय स्पीड डेटा

एअरटेलच्या या दोन प्रीपेड प्लॅनबद्दल सविस्तर जाणून घेऊयात.

airtel recharge plan price hike
Airtel – संग्रहित छायाचित्र / फायनान्शिअल एक्सप्रेस

Airtel Plans: जर तुम्ही एअरटेल कंपनीचे सिमकार्ड वापरत असाल आणि तुम्ही खास अशा प्रीपेड प्लॅनची वाट बघत असाल तर एअरटेलने तो प्लॅन वापरकर्त्यांसाठी आणला आहे. एअरटेलने एकाचवेळी दोन नवीन प्रीपेड प्लॅन लाँच केल्या आहेत. ज्यामध्ये तुम्हाला बंपर हाय स्पीड डेटा वापरयाला मिळणार आहे. तसेच यामध्ये अनलिमिटेड कॉलिंग सुद्धा मिळणार आहे. एअरटेलच्या या दोन प्रीपेड प्लॅनबद्दल सविस्तर जाणून घेऊयात.

एअरटेलचा ४८९ रुपयांचा प्लॅन

एअरटेल ४८९ रुपयांचा एक प्रीपेड प्लॅन वापरकर्त्यांसाठी लाँच केला आहे. या प्लॅनबद्दल बोलायचे झाल्यास ४८९९ रुपयांच्या प्लॅनमध्ये सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग , ३०० एसएमएस आणि ५० जीबी डेटा वापरायला मिळतो. या प्लॅनची वैधता ३० दिवसांची आहे. या प्लॅनच्या इतर फायद्याबद्दल बोलायचे झाल्यास यात फ्री हॅलो ट्यून, अपोलो 24/7 सर्कल आणि FASTag रिचार्जवर कॅशबॅक असे फायदे या प्लॅनमध्ये उपलब्ध आहेत.

हेही वाचा : Airtel चा ग्राहकांना मोठा धक्का, आता ९९ नाही तर..; ५७ टक्कयांनी महागला सर्वात स्वस्त प्लॅन

एअरटेलचा ५०९ रुपयांचा प्लॅन

एअरटेलने आणखी एक ५०९ रुपयांचा प्रीपेड प्लॅन आणला आहे. या प्लॅनची वैधता ३० दिवसांची आहे. यामध्ये तुम्हाला अनलिमिटेड लोकल आणि एसटीडी कॉलिंग मिळणार आहे. तसेच ३०० एसएमएस आणि ६० जीबी हाय स्पीड डेटा वापरायला मिळणार आहे. तसेच यामध्ये विंक म्युझिक मोफत मिळणार आहे. फ्री हॅलो ट्यून, अपोलो 24/7 सर्कल आणि FASTag रिचार्जवर कॅशबॅक उपलब्ध आहे.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान ( Tech ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 27-01-2023 at 15:13 IST
Next Story
Microsoft Edge आजच अपडेट करा नाहीतर…; सरकारने दिला अलर्ट