scorecardresearch

Airtel चा ग्राहकांना मोठा धक्का, आता ९९ नाही तर..; ५७ टक्कयांनी महागला सर्वात स्वस्त प्लॅन

Airtel कंपनीने बंद केलेला हा प्लॅन कोणता आहे आणि आता सर्वात स्वस्त प्लॅन कोणता आहे हे जाणून घेऊयात.

Airtel Cancelled 99 rs plan
Bharati Airtel – संग्रहित छायाचित्र / लोकसत्ता

एअरटेल ही एक टेलिकॉम कंपनी आहे. आपल्या वापरकर्त्यांसाठी ही कंपनी अनेक नवनवीन प्लॅन ज्यात आधी फायदे मिळतील असे प्लॅन लाँच करत असते. मात्र एअरटेलने आपल्या वापरकर्त्यांना एक मोठा धक्का दिला आहे. एअरटेलने आपला सर्वात स्वस्त प्लॅन बंद केला आहे. एअरटेल कंपनीने बंद केलेला हा प्लॅन कोणता आहे आणि आता सर्वात स्वस्त प्लॅन कोणता आहे हे जाणून घेऊयात.

एअरटेलने आपला सर्वात स्वस्त प्लॅन रद्द करून ग्राहकांना मोठा धक्का दिला आहे. एअरटेलने हा प्लॅन आंध्र प्रदेश, हिमाचल प्रदेश, बिहार, कर्नाटक, राजस्थान आणि नॉर्थ ईस्ट सर्कलमध्ये हा प्लॅन बंद झाला असून सर्वात स्वस्त प्लॅनची किंमत देखील वाढली आहे.

हेही वाचा : Airtel Recharge Plan: एअरटेलने आणला सर्वात स्वस्त प्लॅन; ३५ रुपयांत मिळणार ‘इतका’ जीबी डेटा

एअरटेलने आपला ९९ रुपयांचा प्लॅन बंद केला आहे त्यामुळे आता सर्वात स्वस्त प्लॅनची किंमत ही वरील ठिकाणी १५५ रुपये इतकी झाली आहे. याआधी एअरटेलने हरियाणा आणि ओडिशामध्ये नोव्हेंबर २०२२ मध्ये ९९ रुपयांचा प्लॅन बंद केला होता. १५५ रुपयांचा प्लॅनची ९९ रुपयांच्या प्लॅनही तुलना केल्यास एअरटेलच्या सर्वात स्वस्त प्लॅनची किंमत ५७ टक्क्यांनी वाढली आहे. ९९ रुपयांच्या प्लॅनमध्ये २.५ प्रति सेकंद आणि व्हॉइस कॉलसाठी २०० एमबी डेटा देण्यात आला होता.

१५५ रुपयांचा एअरटेलचा प्लॅन

एअरटेलने ९९ रुपयांचा प्लॅन बंद केल्यामउळे सर्वात स्वस्त प्लॅन हा १५५ रुपयांचा आहे. या प्लॅनची वैधता २४ दिवसांसाठी असणार आहे. या प्लॅनमध्ये १ जीबी डेटा , ३०० एसएमएस असे फायदे वापरकर्त्यांना मिळणार आहे. या प्लॅनमधील डेटा संपल्यानंतर प्रति एमबी ५० पैसे इतके शुल्क वापरकर्त्याला द्यावे लागणार आहे. एअरटेलच्या या प्लॅनमध्ये हेलोट्यून्स आणि विंक म्युझिक हे मोफत वापरता येणार आहे.

हेही वाचा : Airtel की Jio? कोणाचे 5 जी प्लॅन आहेत फायदेशीर; जाणून घ्या

याशिवाय एअरटेलचा १७९ रुपयांच्या प्लॅन हा २०० रुपयांपेक्षा कमी किंमतीत असणारा प्लॅन आहे . यामध्ये २८ दिवसांची वैधता , अनलिमिटेड कॉल्स , ३०० एसएमएस, आणि २ जीबी देता मिळतो. तसेच १९९ रुपयांच्या प्लॅनची वैधता ही ३० दिवसांची आहे. त्यात सुद्धा ३ जीबी देता आणि अनलिमिटेड कॉल्स व ३०० एसएमएस वापरकर्त्याला मिळतात.

दररोज डेटा देणारा एअरटेलचा सर्वात स्वस्त प्लॅन हा २०९ रुपयांचा आहे. या प्लॅनची वैधता २१ दिवसांची आहे. यात अनलिमिटेड कॉल्स आणि दररोज १०० एसएमएस करायला मिळतात. या प्लॅनमध्ये १ जीबी डेटा मिळतो.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान ( Tech ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 27-01-2023 at 13:13 IST