Premium

एअरटेलच्या ‘या’ पॅकमध्ये मिळवा १५ ओटीटी अ‍ॅप्सचे सब्सक्रिपशन आणि फ्री डेटादेखील

एअरटेलच्या १४८ रुपयांच्या अ‍ॅड ऑन प्लॅनमध्ये मोफत डेटासह १५पेक्षा जास्त OTT अ‍ॅप्सचे सबस्क्रिप्शन दिले जात आहे. यासोबतच इतरही अनेक सुविधा दिल्या जात आहेत.

airtel 148 add on plan
फक्त १४८ रुपयांमध्ये १५ ओटीटी अ‍ॅप्सचे मिळवा सब्सक्रिपशन आणि फ्री डेटा ( फोटो – लोकसत्ता )

एअरटेलने त्यांच्या ग्राहकांसाठी एक सर्वोत्तम स्मार्ट रिचार्ज पॅक सादर केला आहे. या रिचार्ज पॅकमध्ये, वापरकर्त्यांना १५ पेक्षा जास्त OTT अ‍ॅप्सचे सबस्क्रिप्शन मिळणार आहे. तुम्हाला स्मार्ट टीव्हीवर अधिक ओटोटी अ‍ॅप्स पाहण्याची इच्छा असल्यास, हा पॅक तुमच्यासाठी सर्वोत्तम ठरू शकतो. कारण या प्लॅनमध्ये १५ पेक्षा जास्त अ‍ॅप्सचे सबस्क्रिप्शन फक्त १४८ रुपयांमध्ये दिले जात आहे. यासोबतच हे अ‍ॅप्स चालवण्यासाठी फ्री डेटाही दिला जात आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

एअरटेल १४८ पॅक असा अ‍ॅड ऑन पॅक सुरु केला आहे. म्हणजे तुम्हाला नियमित प्लॅन रिचार्ज करावा लागेल. तुम्ही नियमित एक महिन्याचा रिचार्ज प्लॅन करत असाल, तर यात अ‍ॅड ऑन डेटा पॅकची वैधता तुमच्या नियमित एका महिन्याच्या प्लॅनइतकीच असेल. या प्लॅनमध्ये यूजर्सना १ GB फ्री डेटा दिला जातो आहे. मात्र, या प्लॅनमध्ये तुम्हाला कॉल करण्याची सुविधा मिळत नाही. पण हा प्लान १५ पेक्षा जास्त OTT अ‍ॅप्सच्या सबस्क्रिप्शनसह येतो. या प्लॅनमध्ये Sony Liv, Lionsgate Play, Eros Now, Hoichoi, ManoramaMax आणि Airtel Xstream Play चे मोफत सबस्क्रिप्शन ३० दिवसांसाठी दिले जाते.

हेही वाचा – WhatsAppने एप्रिलमध्ये ७४ लाख भारतीय अकाउंट्स केले बॅन! तुम्ही करत नाही ना ही चूक?

हा पॅक का आहे फायदेशीर

जर तुम्ही हे १५ अ‍ॅप्स ३० दिवसांसाठी वेगळे रिचार्ज केले तर तुम्हाला ५०० ते ६०० रुपये खर्च करावे लागतील. एअरटेलच्या १४८च्या अ‍ॅड ऑन प्लॅनमध्ये डेटासह १५ अ‍ॅप्सचे मोफत सबस्क्रिप्शन मिळत आहे.

टीप – जर तुम्ही 3 महिन्यांसाठी रिचार्ज करत असाल, तर त्या कालावधीत तुम्हाला १५ अ‍ॅप्सचे जास्तीत जास्त ३० दिवसांसाठी मोफत सबस्क्रिप्शन दिले जाईल. त्याचप्रमाणे जर नियमित रिचार्ज प्लॅन कमी दिवसांचा असेल तर योजना लवकरच संपेल.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 08-06-2023 at 18:45 IST
Next Story
प्रतीक्षा संपली! २०० MP कॅमेऱ्यासह लॉन्च झाली Realme ची ‘ही’ जबरदस्त सिरीज, ड्युअल नॅनो सिमसह मिळणार…