Airtel 90 Days Recharge Plan : मोबाईलचा रिचार्ज संपण्याची तारीख (Airtel Recharge Plan) जेव्हा जेव्हा समोर येते तेव्हा आता किती रुपयांचा रिचार्ज करायचा असा प्रश्न आपल्या सगळ्यांसमोर उभा राहतो. कारण काही रिचार्ज प्लॅनच्या ​​किमती गगनाला भिडल्या आहेत आणि ज्यांची किंमत कमी असते त्यात पाहिजे तितके फायदे आपल्याला मिळत नाहीत. त्यामुळे कोणता प्लॅन निवडायचा हे ठरवण्यात नेहमीच तारांबळ उडते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पण, आता तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही. भारतातील सर्वात मोठी दूरसंचार कंपनी एअरटेल एक ९० दिवसाचा नवीन प्लॅन (Airtel Recharge Plan) तुमच्यासाठी घेऊन आली आहे. या प्लॅनमध्ये दिवसाला किती एसएमएस, किती जीबी डेटा आणि किती रुपयांचा हा रिचार्ज प्लॅन असणार आहे हे आपण जाणून घेऊया…

एअरटेल विविध प्रकारच्या आकर्षक प्लॅन ऑफर करत असते. तर वारंवार रिचार्जचे ओझे कमी करण्यासाठी, एअरटेलने एक परवडणारा प्लॅन आणला आहे. प्रत्येक महिन्याला रिचार्ज न करता तुम्ही ९० दिवसांचा रिचार्ज करून ९० दिवस अगदी टेन्शन फ्री (Airtel Recharge Plan) राहू शकता. या प्लॅनमध्ये तुम्हाला फक्त ९२९ रुपयांमध्ये ९० दिवसांसाठी स्थानिक आणि एसटीडी नेटवर्कवर अमर्यादित कॉलिंग, सर्व स्थानिक आणि एसटीडी नंबरसाठी दररोज १०० विनामूल्य एसएमएस, दररोज १.५ जीबी हाय-स्पीड डेटा, दैनंदिन मर्यादा गाठल्यानंतरही कमी वेगाने नेट वापरणे सुरु ठेवण्याची परवानगी सुद्धा देतो.

९० दिवसांमध्ये एकूण १३५ जीबीचा डेटा

तसेच हा रिचार्ज प्लॅन ९० दिवसांमध्ये एकूण १३५ जीबीचा डेटा तुम्हाला देतो. याव्यतिरिक्त, या Airtel प्लॅनमध्ये 5G डेटाचा अमर्याद प्रवेश समाविष्ट आहे. एअरटेल अतिरिक्त लाभ देऊन या ९२९ रुपयांच्या रिचार्ज प्लॅनमध्ये Airtel Extreme Play द्वारे ग्राहकांना टीव्ही शो, चित्रपट आणि थेट चॅनेल पाहण्यासाठी आणि Hello Tune मध्ये मोफत प्रवेश करण्याची संधी सुद्धा ग्राहकांना देते आहे.तर तुम्हालाही दर महिन्याला रिचार्ज करून कंटाळा आलाअसेल , तुम्ही एअरटेलचे ग्राहक असाल तर तुम्ही हा रिचार्ज प्लॅन नक्की ट्राय करून पाहा.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Airtel recharge plan for 90 days offers one point five gb data per day with unlimited calls for just 10 rupees per day asp