Airtel's affordable recharge plan | Loksatta

एअरटेलचा ‘हा’ रिचार्ज प्लॅन परवडणारा; वर्षभराच्या वैधतेसह मिळेल बरचं काही… 

एअरटेलची टेलिकॉम सेवा वापरत असणाऱ्या ग्राहकांना एका अतिशय चांगल्या रिचार्ज प्लॅनबद्दल आणि अधिक सुविधांसह येणाऱ्या प्लॅनची ​​माहिती देणार आहोत. जाणून घेऊया…

एअरटेलचा ‘हा’ रिचार्ज प्लॅन परवडणारा; वर्षभराच्या वैधतेसह मिळेल बरचं काही… 
(फाईल फोटो)

मोबाईल रिचार्ज हा दर महिन्याचा खर्च बनला आहे. त्यामुळे स्वस्त रिचार्ज प्लॅन मिळावा, असं प्रत्येकाला वाटत असतं, एअरटेल, आयडीयासह टेलिकॉम कंपन्यांकडून स्वस्त रिचार्ज कसा मिळेल. याकडे पाहिलं जातं. त्यातही डेटा अधिक मिळाल्यास आणि त्याची वैधता अधिक असल्याच ग्राहक त्या प्लॅनला जास्त पसंती देतात. भारतीय टेलिकॉम मार्केटमध्ये एअरटेल सतत जीओला आव्हान देत आहे. एअरटेलची टेलिकॉम सेवा वापरत असणाऱ्या ग्राहकांना एका अतिशय चांगल्या रिचार्ज प्लॅनबद्दल आणि अधिक सुविधांसह येणाऱ्या प्लॅनची ​​माहिती देणार आहोत. जाणून घेऊया…

१ हजार ७९९ हा एअरटेलचा परवडणारा रिचार्ज प्लॅन आहे. यामध्ये तुम्हाला १,७९९ रुपयांच्या रिचार्जवर संपूर्ण वर्षाची वैधता मिळत आहे. जे लोक त्यांच्या घरात किंवा ऑफिसमध्ये इंटरनेटसाठी वायफाय वापरतात आणि मोबाईल डेटाचा वापर कमी वेळासाठी करतात. त्यांच्यासाठी एअरटेलचा हा प्लॅन सर्वोत्तम पर्याय ठरू शकतो. एअरटेलच्या या परवडणाऱ्या रिचार्ज प्लॅनमध्ये तुम्हाला इतरही अनेक फायदे मिळतात.तर जाणून घ्या त्याबद्दल सविस्तर माहिती.

एअरटेलच्या या प्लानमध्ये तुम्हाला अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा मिळत आहे. या रिचार्ज प्लॅनची ​​किंमत १,७९९ रुपये आहे आणि ती एकूण ३६५ दिवसांची वैधता देते.

आणखी वाचा : ठरलं! BSNL ‘या’ दिवसापासून सुरु करणार 4G व 5G सेवा

हा प्लान रिचार्ज केल्यानंतर तुम्हाला इंटरनेटची मजाही मिळेल. एअरटेलच्या या रिचार्ज प्लॅनमध्ये तुम्हाला इंटरनेट वापरासाठी एकूण २४ जीबी डेटा मिळतो. इंटरनेट डेटा संपल्यानंतर, तुम्ही तुमच्या फोनमधील डेटा अॅड ऑन प्लॅन रिचार्ज करू शकता. तुमच्या स्मार्टफोनमध्ये हा प्लॅन रिचार्ज केल्यानंतर तुम्हाला एसएमएसची सुविधाही मिळत आहे.

यामध्ये तुम्हाला एकूण ३,६०० एसएमएस मिळतात. परवडणारी किंमत आणि दीर्घ वैधतेसह एअरटेलचा हा सर्वात स्वस्त रिचार्ज प्लॅन आहे. अशा परिस्थितीत, जर तुम्हाला तुमच्या स्मार्टफोनमध्ये एअरटेलचा कोणताही स्वस्त रिचार्ज प्लान रिचार्ज करायचा असेल. अशा परिस्थितीत ही योजना तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय ठरू शकते.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान ( Tech ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
OPPOचा ‘हा’ स्मार्टफोन भारतीय बाजारपेठेत सादर; जाणून घ्या किंमत आणि बरचं काही…

संबंधित बातम्या

विश्लेषण: AIIMS चा सर्व्हर हॅक करून मागितली २०० कोटींची खंडणी, रॅन्समवेअर कुणावरही करू शकतो हल्ला! कसा कराल बचाव?
जिओचे २०० रुपयांखालील प्लान्स पाहिलेत का? UNLIMITED CALLS, इंटरनेटसह मिळतंय बरच काही, पाहा यादी
प्रतीक्षा संपली! ५० MP कॅमेरा असलेला Tecno Spark 9T भारतात लॉंच, किंमत १० हजारांपेक्षा कमी
चिंताजनक: 9-10 वर्षांची मुलं अडकतायत सोशल मीडिया व ऑनलाइन गेमिंगच्या जाळ्यात, कारण माहितेय का?
४८,४९९ रुपयांत मिळवू शकता APPLE IPHONE 13, केवळ ‘हे’ करा

व्हिडिओ

ताज्या बातम्या
या चित्रात असलेली चुक तुम्हाला दिसली का? तीक्ष्ण नजर असणाऱ्यांना पटकन येईल ओळखता
पुण्यातील तरुणाचा भन्नाट प्रयोग; चक्क कंटेनरमध्ये घेतले काश्मिरी ‘केशर’चे पीक
मालवणी जेवण, ठेचा- बाकरवडी अन्… ‘चला हवा येऊ द्या’मध्ये विकी कौशलची थेट मराठीत डायलॉगबाजी
शेतकऱ्यांच्या मुलांना ड्रोन चालवण्याचं प्रशिक्षण दिलं जाणार; खरेदीसाठी सबसिडीही मिळणार – कृषीमंत्री अब्दुल सत्तार
“आता लवकरच…” लग्नानंतरची पाठकबाईंची ‘ती’ पोस्ट चर्चेत