आर्थिक मंदीचे कारण देत अनेक दिग्गज टेक कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांची कपात करत आहेत. यामध्ये Meta, Amazon , Google , Microsoft अशा कंपन्यांचा समावेश यामध्ये आहे. आता Amazon या कंपनीने बुधवारपासून आपल्या दुसऱ्या फेरीतील कर्मचारी कपातीला सुरुवात केली आहे. याची घोषणा कंपनीने गेल्या महिन्यामध्ये केली आहे. या नोकर कपातीचा परिणाम कंपनीतील साधारणपणे ९,००० कर्मचाऱ्यांवर होणार आहे. तसेच कपातीची सुरुवात यावेळेस क्लाउड सर्व्हिस ऑपरेशन आणि HR डिपार्टमेंट या विभागांपासून होणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

Amazon Web Services (AWS) हा कंपनीचा सर्वात फायदेशीर विभाग आहे. मात्र याच विभागामध्ये विक्रीतीळ वाढ मंदावली असल्याने कंपनीने कर्मचारी कपातीचा निर्णय घेतला आहे. कर्मचारी कपात ही सुरुवातीला अमेरिका, कॅनडा आणि कोस्टा रिका यामधील कर्मचाऱ्यांपासून होणार आहे. हळू हळू जागतिक स्तरावर त्याची अंमलबजावणी केली जाणार आहे.

हेही वाचा: Vodafone Idea जिओ आणि एअरटेलवर नाराज? Trai कडे ‘या’ कारणासाठी केली तक्रार, जाणून घ्या काय आहे प्रकरण

कंपनीचे सीईओ अ‍ॅडम सेलिपस्की आणि HR प्रमुख बेथ गॅलेटी प्रभावित कर्मचार्‍यांना बुधवारी सकाळी कमर्चारी कपातीबद्दल माहिती दिली. CNBC द्वारे मिळालेल्या एका इंटर्नल मेमोमध्ये AWS प्रमुख अ‍ॅडम सेलिपस्की यांनी सांगितले, ”आमच्या कंपनीसाठी हा एक कठीण दिवस आहे. Amazon मधील कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याच्या निर्णयानंतर प्रभावित AWS कर्मचार्‍यांशी संभाषण आजपासून सुरू झाले आहे. याबाबत अमेरिका, कॅनडा आणि कोस्टा रिकामधील सर्व प्रभावित कर्मचाऱ्यांना याबाबत मेसेज देण्यात आले आहेत.”

मार्च महिन्यामध्ये सीईओ अँडी जॅसी यांनी ९,००० कर्मचारी कपातीची घोषणा केली आहे. तसेच १८ एप्रिल रोजी या योजनेचा एक भाग म्हणून Amazon ने त्यांच्या जाहिरात विभागामधील काही कर्मचाऱ्यांची कपात केली आहे.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Amazon layoff second round hr and cloud service operation department aws usa canada and globally tmb 01