September 2023 Apple Event: Apple ही दिग्गज टेक कंपनी आहे. iPhone 15 या वर्षातील सर्वाधिक बहुप्रतीक्षित असा स्मार्टफोन आहे.  अ‍ॅपल कंपनीने मंगळवारी त्यांच्या वार्षिक आयफोन इव्हेंटचे आमंत्रण पाठवले आहे. ज्यात अनेक प्रॉडक्ट्स सादर १२ सप्टेंबर रोजी कंपनीच्या क्यूपर्टिनो, कॅलिफोर्निया येथील मुख्यालयात होणार असल्याची पुष्टी कंपनीने केली आहे. पाठवलेल्या आमंत्रणामध्ये या इव्हेंटला “Wonderlust” असे नाव देण्यात आले असून तसेच निळ्या आणि सोनेरी रंगामध्ये Apple चा लोगो देखील त्यात दिसत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कंपनीने दिलेल्या आमंत्रणामध्ये कोणती प्रॉडक्ट्स लॉन्च होतील हे स्पष्टपणे सांगण्यात आलेले नाही. तथापि Apple द्वारे सकाळी १० वाजता (भारतीय वेळेनुसार रात्री १०. ३०) सुरू होणाऱ्या इव्हेंटमध्ये त्याच्या पुढील जनरेशनच्या आयफोन १५ सिरिजचे लॉन्चिंग करण्याची शक्यता आहे.

हेही वाचा : लॉन्च होण्यापूर्वीच लीक झाली iPhone 15 ची किंमत, iPhone १४ पेक्षा आहे ‘इतका’ महाग

वार्षिक इव्हेंट ज्या ठिकाणी होणार आहे ते असे ठिकाण आहे की जिथे कंपनी आपले नवीन प्रॉडक्ट्स विशेष करून iPhones तसेच Apple Watch सादर करत असते. यावेळी देखील इथे मोठा इव्हेंट होणार आहे. कंपनीचे लक्ष हे नवीन आयफोन्स वर केंद्रित असेल. या वर्षी चार नवीन मॉडेल लॉन्च होण्याची अपेक्षा आहे. ज्यामध्ये आयफोन १५ मॉडेल आणि दोन हाय एन्ड आयफोन १५ प्रो व्हेरिएंटचा समावेश आहे. याबाबतचे वृत्त Indian Express ने दिले आहे.

त्याच्यामध्ये सर्वात मनोरंजक हा आयफोन १५ प्रो मॉडेल असेल. ज्याला कंपनीचा पहिला 10x ऑप्टिकल झूम कॅमेरा आणि गोल-एज डिझाइनसह सर्व-नवीन टायटॅनियम केसिंग मिळणार आहे. आयफोन १५ प्रो मॅक्स हा आयफोन १५ अल्ट्रामध्ये रीब्रँड केला जाऊ शकतो असा अंदाज आहे. कंपनीद्वारे आयफोन १५ सह डिझाइनमध्ये काही मोठे बदल करणे अपेक्षित आहे. ज्यात USB-C पोर्टचा समावेश आहे. इतर बदलांबाबत बोलायचे झाल्यास त्यात आयफोन मॉडेल्सवर ”अ‍ॅक्शन बटण” देखील दिले जाऊ शकते.

हेही वाचा : लॉन्चिंगपूर्वीच iPhone 15 Ultra चे स्पेसिफिकेशन्स झाले लीक, किंमत…, एकदा पाहाच

आयफोन १५ अल्ट्रा मध्ये कॅमेरा अ‍ॅपसह क्विक लॉन्च अ‍ॅप्ससाठी बाजूला एक ”अ‍ॅक्शन बटण” देखील दिले जाऊ शकते. मागील वर्षी अ‍ॅपल वाचवर देखील असेच बटण देण्यात आले होते.  आयफोन १५ सिरीज ही कंपनीची आतापर्यंतची सर्वात महाग सिरीज असण्याची शक्यता आहे. रिपोर्टच्या आधारानुसार, आयफोन १५ आणि आयफोन १५ प्रो मॅक्स दोन्हीची किंमत आधीच्या सिरीजमधील फोनपेक्षा जास्त असू शकते. क्यूपर्टिनो इथे हा इव्हेंट होणार असून याचा वापर कंपनी यावर्षी लॉन्च होणाऱ्या Apple वॉचबद्दल अधिक सांगण्यासाठी करू शकते. वॉच लाइनअपमध्ये काही किरकोळ अपडेट असू शकतात. कंपनी दुसऱ्या जनरेशनमधील Apple वॉच अल्ट्रासह दोन सिरीज ९ मॉडेल सादर करण्याची अपेक्षा आहे.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Apple iphone 15 series luanch 12 septmber 2023 wonderlust event check features and details tmb 01