Google ला टक्कर देण्यासाठी Apple लवकरच आणणार स्वतःचे सर्च इंजिन; जाणून घ्या तपशील

गुगलला टक्कर देण्यासाठी अ‍ॅपल आगामी काळात स्वतःचे सर्च इंजिन लॉंच करणार आहे.

Google ला टक्कर देण्यासाठी Apple लवकरच आणणार स्वतःचे सर्च इंजिन; जाणून घ्या तपशील
अ‍ॅपलने आपल्या बाजूने या सर्च इंजिनबद्दल कोणतीही माहिती दिलेली नाही. (Photo : Indian Express)

तुम्ही स्मार्टफोन, टॅब्लेट आणि लॅपटॉप इत्यादी प्रीमियम स्मार्टफोन ब्रँड्सबद्दल ऐकले असेल. पण तुम्हाला माहिती आहे का की आता अ‍ॅपल एक पूर्णपणे नवीन आणि अनोखी सेवा आणणार आहे! बातमीनुसार, गुगलला टक्कर देण्यासाठी अ‍ॅपल आगामी काळात स्वतःचे सर्च इंजिन लॉंच करणार आहे. आज आपण याबद्दल अधिक माहिती जाणून घेणार आहोत.

आधीच सांगितल्याप्रमाणे, अ‍ॅपल एका सर्च इंजिनवर काम करत आहे जे गुगलशी स्पर्धा करणार आहे. आजच्या काळात असे एकही सर्च इंजिन नाही, जे गुगलला टक्कर देईल. पण आता अ‍ॅपल गुगलच्या विरोधात उभे ठाकणार असल्याचे दिसते. हे एक नवीन वापरकर्ता-केंद्रित ईआरबी सर्च इंजिन असेल जे जानेवारी २०२३ पर्यंत लॉंच केले जाऊ शकते.

युजर्सची सुरक्षा वाढवण्यासाठी Whatsapp ने उचलले महत्त्वाचे पाऊल; ‘हे’ नवे फीचर करणार मदत

अ‍ॅपलने आपल्या बाजूने या सर्च इंजिनबद्दल कोणतीही माहिती दिलेली नाही, मात्र लीक झालेल्या काही गोष्टींच्या माध्यमातून याबाबतची माहिती समोर आली आहे. टेक ब्लॉगर रॉबर्ट स्कोबल यांनी अनेक आइस प्रोडक्ट्स आणि सेवांचे वर्णन केले आहे जे अ‍ॅपल त्यांच्या ‘डब्ल्यूडब्ल्यूडीसी २०२३ इव्हेंट’मध्ये लॉंच करणार आहे. यामध्ये अ‍ॅपलच्या नवीन सर्च इंजिनचा समावेश आहे. रॉबर्ट स्कोबल म्हणतात की त्यांची माहिती स्त्रोत आणि त्यांच्या अंदाजांवर आधारित आहे.

इलेक्ट्रॉनिक उत्पादनांच्या मागे CE लिहण्याचं कारण काय? जाणून घ्या

अ‍ॅपलचे नवीन सर्च इंजिन जानेवारीमध्ये लॉंच केले जाऊ शकत असले तरी अ‍ॅपलचा डब्ल्यूडब्ल्यूडीसी २०२३ इव्हेंट लवकरच येणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अ‍ॅपल या इव्हेंटमध्ये मॅकबुक एअरसोबत नवीनतम आयओएस १६, आयपॅड ओएस १६, वॉचओएस आणि मॅकओएस १३ सॉफ्टवेअर अपडेट्स देखील जारी करू शकते. तसेच आयफोन १४ सीरीज देखील या वर्षी सप्टेंबरमध्ये लॉंच होणार आहे.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान ( Tech ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Apple will soon launch its own search engine to compete with google learn the details pvp

Next Story
Indian Railways update: IRCTC वेबसाइट आणि अ‍ॅपवरून तिकीट बुकिंगच्या नियमांमध्ये केले बदल, जाणून घ्या नवा निर्णय
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी