वायू प्रदूषणातील कार्बन मोनॉक्साइड हा एक घटक आहे. म्हणजे आज सर्वाधिक वाहने पेट्रोल आणि डिझेलवर धावतात. या दोन्ही पारंपरिक इंधनाला हायड्रोजन पर्याय ठरेल का, हा महत्त्वाचा मुद्दा केंद्र सरकारसमोर आहे. सरकारने इथेनॉलला वळसा देऊन हायड्रोजन इंधन निर्मितीचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. देशात सरकार आणि प्रशासन पातळीवर हायड्रोजनवर चालणाऱ्या कार वापरल्या जात आहेत. वाहनांमध्ये पर्यायी इंधन म्हणून हायड्रोजन कितपत उपयोगी ठरेल याविषयी घेतलेला हा पडताळा.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> सर्वात स्वस्त फ्लाइट बूक करण्यासाठी Google करणार मदत; लॉन्च केले नवीन फिचर, कधी आणि कसे करता येईल बुकिंग?

निर्मिती आणि संचालन

* हायड्रोजन आणि ऑक्सिजन यांच्या रासायनिक प्रक्रियेतून विद्युतनिर्मिती केली जाते. यालाच ‘हायड्रोजन फ्युअल सेल’ म्हटले जाते.

* सध्या ‘टोयोटा’ या कंपनीने वर्षभरापूर्वी ‘हायड्रोजन फ्युअल सेल’वर चालणाऱ्या वाहनांची निर्मिती सुरू केली आहे. त्यांनी ‘मिराइ’ हे कारचे प्रतिरूप (मॉडेल) बाजारात आणले आहे. या कारमध्ये हायड्रोजन इंधन कोश आणि लिथियम कोश (फ्युअल सेल-बॅटरी) बसविण्यात आला आहे. 

मिराइविषयी

* ‘मिराइ’ कारमधून एकल टाकीत (सिंगल टँक) भरलेल्या हायड्रोजनवर साधारण ४५० किलोमीटर प्रवास करता येणे शक्य आहे.

* काही विकसित देशांत ‘हायड्रोजन फ्युअल सेल’वर चालणाऱ्या कार आणि काही यंत्रांसाठी (ऑफ रोड) धोरण आखले जात आहे.

* निरोगी माणसाच्या शरीरात श्वासांद्वारे अडीच टक्क्यांपर्यंत गेलेला हायड्रोजन कोणताही परिणाम होऊ शकलेला नाही,  असे वैद्यकीय निरीक्षण आहे.

हेही वाचा >>> Vodafone-Idea च्या ‘या’ तीन प्लॅन्समध्ये मिळते डिस्नी + हॉटस्टारचे मोफत सबस्क्रिप्शन, जाणून घ्या

समस्या आणि उपाय

* पेट्रोल आणि डिझेलवर चालणाऱ्या वाहनांमधून नायट्रोजनॉक्साइड, हायड्रोकार्बन्स आणि अडीच मायक्रॉनपेक्षा अधिक जाडीचे कण हवेत मिसळले जातात.

* हायड्रोजन इंधनाच्या (हायड्रोजन फ्युएल सेल) ज्वलनातून केवळ उष्ण वाफ वातावरणात फेकली जाईल. ज्याचा उल्लेख झिरो एमिशन असा केला जातो.

* वातावरणात पसरणाऱ्या विषाक्त कणांचे प्रमाण हायड्रोजनमध्ये शून्य असते. हायड्रोजन हा हवेपेक्षाही हलका आहे. * हायड्रोजन इंधन हा सध्या मीडियम डय़ुटी घटक म्हणून पाहिला जात आहे. म्हणजे मर्यादित टप्प्यातील वहन अर्थात शहरी प्रवासी वाहतुकीसाठी हे इंधन पूरक ठरेल. भारतातील काही संशोधकांनी एक किलो हायड्रोजनवर दीडशे किलोमीटर प्रवासाची हमी दिली आहे.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Article analysis future of hydrogen fuel in india zws