स्मार्टफोनच्या दुनियेत सध्या मोठ्या प्रमाणात घडामोडी घडत आहेत. दर काही दिवसांनी नवनवीन स्मार्टफोन बाजारात येताहेत. भारतीय बाजारात स्मार्टफोन्सची मागणी वाढली आहे. प्रत्येकाला नेक्स्ट जेनरेशन टेक्नॉलॉजी असलेला फोन हवा आहे. परंतु सर्वच स्मार्टफोन्स परवडणारे नाहीत. तर काही आपल्या बजेटच्या अगदीच बाहेर आहेत. सध्या कमी बजेटच्या फोनमध्येही फीचर्सची संख्या मोठी असते. त्यामुळे बजेट ४० हजार रुपयांपर्यंत असेल, तर किती तरी उत्तमोत्तम फोन्सचे पर्याय सध्या उपलब्ध आहेत. अशा काही निवडक फोन्सची माहिती घेऊ या. जर तुम्ही स्वस्त मोबाईल शोधत असाल तर आम्ही तुमच्यासाठी एक यादी घेऊन आलो आहोत. ज्यात ४० हजार रुपयांपेक्षा कमी किमतीतील स्मार्टफोनचा समावेश आहे.

स्वस्त स्मार्टफोनची यादी

OnePlus 12R

OnePlus 12R मध्ये 6.78 इंचाचा AMOLED ProXDR डिस्प्ले देण्यात आला आहे. ज्याचे रिजोल्यूशन 2780 x 1264 पिक्सल आणि रिफ्रेश रेट 120Hz आहे. वनप्लस 12आर फोनमध्ये Qualcomm Snapdragon 8 Gen 2 प्रोसेसरसह आला आहे, सोबत 16GB पर्यंत RAM व 256GB पर्यंतची स्टोरेज मिळेल. वनप्लस 12आर पाहता, फोनच्या 8GB RAM व 128GB स्टोरेज मॉडेल तुम्ही ३७,९९९ रुपयांमध्ये हा स्मार्टफोन विकत घेऊ शकता.

(हे ही वाचा : Split की Window AC कोणत्या एसीमुळे वाढते तुमचे विजेचे बिल? माहिती नसेल तर आताच गोंधळ दूर करा )

Xiaomi 14 CIVI

Xiaomi 14 CIVI मध्ये 6.55 इंचाचा OLED डिस्प्ले देण्यात आला आहे. जो 2750 x 1236 पिक्सल रिजोल्यूशन आणि 120Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. Xiaomi 14 CIVI फोन Snapdragon 8s Gen 3 प्रोसेसरसह आला आहे, त्याचबरोबर 12GB पर्यंत RAM व 256GB पर्यंतची स्टोरेज मिळते. फोटोग्राफीसाठी Xiaomi 14 CIVI फोनमध्ये Leica ब्रँडेड ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यात 50MP चा प्रायमरी, 50MP ची टेलीफोटो लेन्स आणि 12MP चा अल्ट्रा-वाइ़ सेन्सर मिळतो. सेल्फी व व्हिडीओ कॉलिंगसाठी या फोनमध्ये 32MP चा ड्युअल फ्रंट कॅमेरा मिळतो. या स्मार्टफोन्ससाठी तुम्हाला ३९,९९९ रुपये मोजावे लागेल.

Motorola Edge 50 Pro

मोटोरोला एज ५० प्रोच्या मागील बाजूस ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे, ज्यात प्रायमरी ५० मेगापिक्सल एआय-संचालित कॅमेरा आहे. यात नवीन फोटो एन्हान्समेंट इंजिन देखील देण्यात आले आहे, जे डायनॅमिक रेंज सुधारते. या स्मार्टफोनमध्ये एआय अडेप्टिव्ह स्टॅबलायाझेशन, ऑटो फोकस ट्रॅकिंग, एआय फोटो एन्हासमेंट इंजिन आणि टिल्ट मोड सारख्या एआय पॉवर्ड कॅमेरा फीचर्स मिळतील.  मोटोरोला स्मार्टफोनमध्ये 6.7 इंचाची 1.5k रिझॉल्यूशन्सचा pOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. तो 2000 निट्स पीक ब्राईटनेस देतो. हा मोबाईल तुम्हाला 144 हर्ट्ज रिफ्रेश रेट, एचडीआर 10 प्लसची सुविधा देतो. या स्मार्टफोन्सची किंमत ३१,९९९ रुपये आहे.

TECNO CAMON 30 Premier

Tecno Camon 30 Premier डिव्हाईसमध्ये 6.77 इंचाचा 1.5 के अ‍ॅमोलेड डिस्प्ले दिला आहे हा LTPO टेक्नॉलॉजीवर चालतो त्याचबरोबर 120Hz रिफ्रेश रेट आणि 1264 x 2780 पिक्सल रिजॉल्यूशन मिळते. डेटा स्टोर करण्यासाठी डिव्हाईसमध्ये 12 जीबी पर्यंत रॅम आणि 512 जीबी पर्यंत इंटरनल स्टोरेज प्रदान करण्यात आले आहे, तसेच फोनमध्ये आणि पावर जोडण्यासाठी 12 जीबी एक्सटेंडेड रॅम आहे. ज्यामुळे 24 जीबी पर्यंत काला सपोर्ट मिळतो.  50 मगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. या स्मार्टफोन्सची किंमत ३९,९९९ रुपये ठेवण्यात आली आहे.