जिओनंतर एअरटेल वापरकर्त्यांना मोठा झटका ! आता 'हा' फायदा रिचार्ज प्लॅनवर मिळणार नाही | Big shock to Airtel users after jio ! Now this benefit will not be available on recharge plan | Loksatta

जिओनंतर एअरटेल वापरकर्त्यांना मोठा झटका ! आता ‘हा’ फायदा रिचार्ज प्लॅनवर मिळणार नाही

एअरटेलने आपल्या रिचार्ज प्लॅनसमध्ये वाढ केल्यानंतर आता ग्राहकांना मिळणारी विशेष सुविधा देखील काढून टाकली आहे. या सुविधेचा फायदा फक्त दोन रिचार्जमध्येच उपलब्ध असेल.

जिओनंतर एअरटेल वापरकर्त्यांना मोठा झटका ! आता ‘हा’ फायदा रिचार्ज प्लॅनवर मिळणार नाही
एअरटेल ग्राहकांना मोठा फटका ( फोटो: indian express)

जिओने आपल्या रिचार्ज प्लॅनसच्या किमतीत वाढ केल्यानंतर इतरही कंपन्यांनी प्रीपेड रिचार्ज प्लॅनसच्या किमतीत वाढ केली होती. एअरटेल कंपनीचे ग्राहक या प्रकरणातून सावरले नसतानाही , अचानक कंपनीने आपल्या ग्राहकांना अजून एक मोठा धक्का दिला आहे. कंपनीने बहुतेक प्रीपेड प्लॅनसमध्ये मिळणाऱ्या अमेझॉन प्राईम व्हीडिओ मोबाईल एडिशन सुविधा गुपचूपपणे काढून टाकली आहे. कंपनीने २०२१ मध्ये एअरटेल थँक्स बेनिफिट्स अंतर्गत हा फायदा जोडला होता. ज्याद्वारे ग्राहक चित्रपट, वेब सीरीज आणि टीव्ही शो पाहू शकत होते. यापुढे ही सुविधेचा फायदा कोणत्या प्लॅनमध्ये मिळणार नाही हे जाणून घेऊया.

‘या’ प्लॅन्समध्ये मिळेल सुविधेचा फायदा

एअरटेल कंपनीने अमेझॉन प्राईम व्हीडिओ मोबाईल एडिशनची सुविधा काढून टाकल्यानंतर आता फक्त दोन एअरटेल प्रीपेड रिचार्जमध्ये या सुविधेचे मोफत ट्रायल दिले जाणार आहे. ज्यामध्ये रुपये ३५९ आणि १०८ रिचार्जचा समावेश आहे. या प्लॅन्सशिवाय, इतर सर्व प्लॅनमध्ये उपलब्ध असलेला हा फायदा काढून टाकण्यात आला आहे.

रिचार्ज महाग होऊ शकतो ?

अलीकडील माहितीनुसार यावर्षी एअरटेल, जिओ आणि वोडाफोन सारख्या खाजगी कंपन्या त्यांच्या रिचार्ज योजनांमध्ये १० ते १२ टक्के वाढ करू शकतात. असे झाल्यास, ज्या रिचार्ज प्लॅनसाठी आज ग्राहकांकडून १०० रुपये घेतले जात आहेत, ते महाग झाल्यानंतर त्या रिचार्ज प्लॅनची ​​किंमत ११० ते ११२ रुपये होऊ शकते.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान ( Tech ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
OnePlus 10R, OnePlus 10 Pro, OnePlus Nord 2 वर बंपर सूट, १० हजारांपर्यंत बचत करण्याची संधी

संबंधित बातम्या

कमजोर दृष्टी, डिस्लेक्सिया असणाऱ्यांसाठी ‘GOOGLE’चे खास फीचर; काय आहे READING MODE? असे करा सुरू
‘APPLE’साठी हा वर्ष ठरला जबरदस्त! 2023 मध्ये लाँच करू शकते ‘ही’ भन्नाट उपकरणे, यादीवर टाका एक नजर
घाई कराल तर आकर्षक फोन्सना मुकाल, डिसेंबरमध्ये लाँच होणार ‘हे’ दमदार फोन; १०८ एमपी कॅमेरा आणि बरेच काही
विश्लेषण: सायबर फसवणुकीतील रक्कम कशी वाचवावी? ‘गोल्डन अवर’ का महत्त्वाचा?
भारतात लॉन्‍च झाला OnePlus 10 Pro 5G, 50MP व 48MP कॅमेरा, जाणून घ्या फिचर्स

व्हिडिओ

ताज्या बातम्या
“ठाकरे गट आणि प्रकाश आंबेडकर आधीपासून एकत्रच, आज केवळ…”, भाजपाचा मोठा दावा
बापरे! एक शिंक आली अन् मृत्यूच्या दारात कोसळला, मित्रांसोबत गप्पा मारताना नेमकं काय घडलं? थरकाप उडवणारा Viral Video पाहा
IND vs BAN: “निश्चित-अनिश्चिततेच्या खेळात तुम्हाला अनपेक्षिततेची…” भारताच्या पराभवावर केएल राहुलने सोडले मौन
मुंबई: दुचाकीच्या धडकेने ५६ वर्षांच्या व्यक्तीचा मृत्यू ; दुचाकीस्वाराला अटक
‘हे’ आयुर्वेदिक उपाय ट्राय करा; खराब कोलेस्ट्रॉल पासून कायमस्वरूपी सुटका मिळेल