Board Exams 2023: दहावी आणि बारावीच्या परीक्षा आता जवळ आल्या आहेत. १२वीची परीक्षा २१ फेब्रुवारीपासून सुरू होतेय. तर पुढच्या महिन्यात म्हणजे २ मार्चपासून दहावीची परीक्षा सुरू होणार आहे. बोर्ड परीक्षा म्हटलं की मुलांना घाम फुटतोच. सध्या मुलं परीक्षेची जोमाने तयारी करत आहेत. प्रत्येक मुलाच्या डोक्यावर अभ्यासाचे प्रेशर आहे. हे प्रेशर दूर करण्यासाठी आज आम्ही तुम्हाला काही मोबाईल अॅप्लिकेशन्सबद्दल सांगणार आहोत, ज्याच्या मदतीने तुम्ही तुमच्या बोर्ड परीक्षा केंद्रावर वेळेवर पोहोचू शकाल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘हे’ तिन्ही अॅप्स येतील तुमच्या कामी

मेट्रो किंवा बस अॅप

तुम्ही मेट्रो शहरांमध्ये राहत असाल तर तुमच्या मोबाईलमध्ये DMRC चे मेट्रो अॅप नक्कीच डाउनलोड करा. या अॅप्लिकेशनच्या मदतीने तुम्ही तुमचा मार्ग अगोदरच पाहू शकता, जेणेकरून तुम्हाला शेवटी कोणतीही अडचण येणार नाही. अनेक वेळा मुले त्यांचा मार्ग तपासत नाहीत आणि शेवटी त्यांना त्याचा त्रास होतो. हे सर्व टाळण्यासाठी तुम्ही तुमचा मार्ग अगोदर पाहूनच चालावे. त्याचप्रमाणे बसेसशी संबंधित मोबाईल अॅप्लिकेशन्सही प्रत्येक शहरासाठी उपलब्ध आहेत. त्यांच्या मदतीने तुम्ही तुमचा मार्ग, भाडे आणि वेळ इत्यादी आधीच पाहू शकता.

(हे ही वाचा: ट्विटर वापरकर्त्यांना झटका! आता फ्री मिळणारे ‘ब्लू टिक’ काढले जाणार, एलन मस्क यांचा मोठा निर्णय )

गुगल नकाशा

गुगल (Google) मॅपच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या घरापासून परीक्षा केंद्राचे अंतर किती आहे आणि कोणत्या वेळी घरातून बाहेर पडायचे, हे तुम्ही आधीच तपासू शकता. कोणत्या वेळी जास्त गर्दी असते आणि कोणत्या मार्गाने तुम्ही परीक्षा केंद्रावर लवकर पोहोचू शकता हे देखील तुम्ही पाहू शकता. परीक्षेच्या दिवशी हे अॅप्स तुमची खूप मदत करतील आणि तुम्ही कोणत्याही तणावाशिवाय परीक्षा केंद्रावर वेळेवर पोहोचाल. दिल्ली, मुंबईसारख्या मेट्रो शहरांमध्ये, तुम्ही वेळेवर न निघाल्यास, ट्रॅफिक जॅममुळे तुम्हाला परीक्षा केंद्रावर जाण्यास उशीर होऊ शकतो.

कॅब बुकिंग अॅप

तुम्ही परीक्षेच्या दिवशी Ola, Uber किंवा InRide ने परीक्षा केंद्रावर जाण्याचा विचार करत असाल, तर तुम्हाला तुमच्या कॅबचे वेळापत्रक अगोदरच ठरवायला हवे. कारण सकाळी लवकर तुम्हाला कॅब मिळणार नाही आणि यामुळे तुम्हाला परीक्षा हॉलमध्ये पोहोचण्यास उशीर होऊ शकतो.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Board exam 2023 there are a bunch of apps to help you plan your travel efficiently and reach exam centres on time pdb