पैशांचा अपहार झालाय? चिंता करू नका, Cyber Fraud झाल्यावर या नंबरवर कॉल करा अन् पैसै वाचवा | Loksatta

पैशांचा अपहार झालाय? चिंता करू नका, Cyber Fraud झाल्यावर या नंबरवर कॉल करा अन् पैसै वाचवा

पैशांचा अपहार झाल्यास आता तुम्हाला चिंता करण्याची गरज नाहीय. कारण…

पैशांचा अपहार झालाय? चिंता करू नका, Cyber Fraud झाल्यावर या नंबरवर कॉल करा अन् पैसै वाचवा
संग्रहित छायाचित्र/लोकसत्ता

Cyber Fraud Helpline Number: ऑनलाईन डिजिटलच्या जमान्यात दिवसेंदिवस सायबर फ्रॉडची प्रकरणं समोर येत आहेत. त्यामुळे पैसे वाचवण्यासाठी तुम्हाला काही गोष्टींबाबत माहिती असणं अत्यंत गरजेचं आहे. पैशांचा अपहार झाल्यास आता तुम्हाला चिंता करण्याची गरज नाहीय. कारण अशा प्रकरणांमध्ये तुम्हाला कोणत्या नंबरवर कॉल केला पाहिजे आणि कशाप्रकारे ऑनलाईन तक्रार दाखल केली पाहिजे, असे प्रश्न नक्की पडतात. पण आता तुम्हाला काळजी करण्याची गरज नाहीय. या महत्वाच्या गोष्टींबाबत खाली दिलेली सविस्तर माहिती नक्की वाचा.

ऑनलाईन फसवणूक आणि सायबर क्राईमच्या प्रकरणांमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. या प्रकरणांना आळा घालण्यासाठी पोलिसांकडून कठोर पावलं उचलली जात आहेत. परंतु. पैशांची फसवणूक करणारे कोणत्या ना कोणत्या मार्गाने युजर्सला त्यांच्या जाळ्यात अडकवतात. अशा परिस्थितीत नेमकं काय करावं? अशा कोड्यात अनेक युजर्सचा गोंधळ उडालेला असतो.घरात चोरी झाल्यावर कोणताही व्यक्ती पहिल्यांदा पोलीस स्टेशनला जातो. परंतु, सायबर क्राईमच्या प्रकरणांमध्ये काय करावं? याचं उत्तर अनेकांना सापडत नाही. लोकांना या प्रकरणांबाबत पुरेशी माहिती नसते, हे यामागचं कारण आहे. युजर्स पोलिसांत तक्रार करण्याआधीच सायबर क्रिमिनल्स फसवणूक करुन पसार झालेले असतात. परंतु, आता तुम्ही फसवणूक झालेले पैसे वाचवू शकता.

आणखी वाचा – Viral Video: ‘विराट’ चाहत्याची स्वप्नपूर्ती, कोहलीला भेटण्यासाठी कायपण, कपिलची कहाणी ऐकून तुम्हीही व्हाल थक्क

सायबर फ्रॉड झाल्यास तातडीनं या नंबरवर कॉल करा

सायबर फ्रॉडबाबत लोकांमध्ये जास्त सतर्कता नसल्याने गुन्हेगार या गोष्टींचा फायदा घेतात. जर तुमच्यासोबत किंवा दुसऱ्या कुणा व्यक्तीसोबत असा प्रकार घडला, तर तुम्हा तातडीनं 1930 या नंबरवर कॉल करा. जर तुम्ही फ्रॉड झाल्यानंतर लगेच पोलिसांना त्या घटनेबाबत 1930 नंबरवर कॉल करून सांगितलं, तर तुमचे पैसे वाचण्याची शक्यता आहे. त्यासाठी तुम्हाला खूप सतर्क राहून तातडीनं पोलिसांना कळवावं लागेल. फसवणूक झाल्यानंतर एक तासाच्या आत तुम्हाला झालेला सर्व प्रकार 1930 नंबरवर कॉल करून सर्व माहिती द्यावी लागेल. पीडित व्यक्तीला अकाउंट डिटेल्स, पैसे ट्रान्सफर झालेली लिंक आणि इतर डिटेल्स पोलिसांना सांगावे लागतील. या सर्व माहितीच्या आधारे पोलीस त्या अकाउंटला फ्रीज करतील आणि तुमचे पैसै वाचवण्यात मदत होईल.

ऑनलाईन तक्रार करण्यासाठी काय कराल? वाचा सविस्तर माहिती


सायबर फ्रॉड झाल्यानंतर तुम्ही ऑनलाईन तक्रार दाखल करु शकता. यासाठी तुम्हाला https://www.cybercrime.gov.in या वेबसाईटवर जावं लागेल. या वेबसाईटवर तुम्हाला अनेक विकप्ल मिळतील. यामध्ये तुम्हाला Report Cyber Crime या सेक्शनवर क्लिक करावं लागेल. त्यानंतर तुम्हाला File a complaint नावाचा विकल्प दाखवला जाईल. त्यानंतर तुम्हाला एक मेसेज दाखवला जाईल, तो वाचून I Accept वर क्लिक करावं लागेल. त्यानंतर एक नवीन विंडो ओपन होईल. यामध्ये तुम्हाला लॉग इन डिटेल्स भराव्या लागतील. जर तुम्ही या वेबसाईटला रजिस्टर केलं नसेल, तर न्यू यूजर विकल्पावर जाऊन स्वत:ची नोंद करावी लागेल.

आणखी वाचा – Miss Sri Lanka आफ्टर पार्टित तुंबळ हाणामारी, महिलांनी उपटल्या एकमेकिंच्या झिंज्या, Viral Video पाहणं मिस करु नका

त्यानंतर तुम्हाला राज्य, लॉग इन आयडी, मोबाईल नंबरची माहिती भरावी लागेल. त्यानंतर तुमच्या मोबाईलवर OTP येईल. त्यावेळी एंटर दाबून कॅप्चा टाकावा लागेल आणि सबमिट करावा लागेल. अशा प्रकारे तुम्ही इथं लॉग इन करु शकता. लॉग इन केल्यानंतर तुम्हाला तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होईल. इथे तुम्हाला कॅटेगरी ऑफ कंप्लेंटमध्ये 8 विकल्प दाखवण्यात येतील. तुम्हाला ज्या कॅटगरीमध्ये तक्रार दाखल करायची आहे, तो विकल्प तुम्ही निवडा. याचसोबत तुम्हाला सब कॅटेगरीलाही निवडावं लागेल.

त्यानंतर झालेल्या घटनेचा सविस्तर तपशील तुम्हाला देता येईल. त्यानंतर Suspect Details चा विकप्ल येईल. जर तुमच्याकडे संशयित व्यक्तीची काही माहिती असल्यात तुम्ही ती माहितीही सबमिट करु शकता. त्यानंतर तुम्हाला Complaint Details वर जावं लागेल. इथे तुम्हाला तुमची डिटेल्स भरून सेव्ह करावं लागणार आहे. शेवटी तुम्हाला प्रीव्यू आणि सबमिटच्या बटनावर क्लिक करावी लागेल. तक्रार सबमिट केल्यानंतर तुम्हाला अॅक्नॉलेजमेंट नंबर मिळेल. तुम्ही तुमच्या तक्रारीची PDF फाईलही डाउनलोड करु शकता. याप्रकारे तुम्ही सायबर फ्रॉडची तक्रार घरबसल्या नोंदणी करु शकता.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान ( Tech ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 26-11-2022 at 20:26 IST
Next Story
विश्लेषण: एलॉन मस्कच्या ट्विटरला नाकारत ब्राझीलच्या नागरिकांचं भारतीय Koo App ला प्राधान्य; दोघांमध्ये नेमका फरक काय?