Associate Partner
Granthm
Education Partner
XAT
Samsung

पोलीस

‘लोकसत्ता’च्या या सदरामध्ये तुम्ही पोलिस विभाग आणि पोलिस अधिकाऱ्यांसंबंधित महत्त्वाच्या बातम्या वाचू शकता. पोलिस (Police)हे एक सुरक्षा दल आहे; ज्यांचे काम देशांतर्गत नागरी सुरक्षा राखणे हे असते. पोलिस दल हे गृहसंरक्षण विभागाच्या अखत्यारीत काम करते. देशाचा कायदा आणि सुव्यवस्था सांभाळण्याची जबाबदारी पोलिसांच्या खांद्यावर असते. गुन्हेगारी कारवाया थांबवणे, गुन्हेगारांना अटक करणे, गुन्ह्यांचा तपास करणे, गुन्हेगार कोण आहे हे शोधणे आणि त्यांचा गुन्हा सिद्ध करण्यासाठी पुरावे गोळा करणे हीदेखील पोलिसांची कामे आहेत. परंतु, गुन्हेगारांना शिक्षा करणे हे पोलिसांचे काम नाही. गुन्हेगारांना शिक्षा देण्यासाठी न्यायालयासमोर संबंधित भक्कम पुरावे आणि माहिती पोलिसांना द्यावी लागते. याआधारावरच न्यायालय एखाद्या व्यक्तीला गुन्हेगार घोषित करू शकते.


महाराष्ट्र पोलिस ही महाराष्ट्र राज्याची कायदा व सुव्यवस्था राखणारी संस्था आहे. हे देशातील सर्वांत मोठ्या पोलिस दलांपैकी एक आहे. ‘सद्रक्षणाय खलनिग्रहणाय’ हे महाराष्ट्र पोलिसांचे ब्रीदवाक्य आहे. सज्जनांचे रक्षण करण्यास आणि दुर्जनांवर नियंत्रण ठेवून त्यांना नष्ट करण्यास महाराष्ट्र पोलिस कटिबद्ध आहेत, असा या ब्रीदवाक्याचा अर्थ आहे. महाराष्ट्र पोलिसांचे प्रमुख पोलिस महासंचालक हे असून, मुंबई येथे राज्याचे पोलिस मुख्यालय आहे. संघ लोकसेवा आयोग, महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र पोलिस खात्यांतर्गत वरिष्ठ अधिकारी निवडले जातात. तर, शिपाई व तत्सम पदांसाठी वेळोवेळी पोलिस भरती प्रक्रिया राबविली जाते. पोलिस दलाच्या विविध कामगिऱ्या, गुन्हेगारी, पोलिस भरती यांसह विविध विषयांसंबंधी सर्व प्रकारच्या बातम्या तुम्हाला येथे वाचता येतील. स्थानिक गुन्हेगारीपासून देश पातळीवरील गुन्हेगारीपर्यंत सर्व माहिती तुम्हाला येथे एका क्लिकवर वाचायला मिळेल.


Read More
Shivaji kon hota
‘शिवाजी कोण होता?’ पुस्तकाचा संदर्भ दिला म्हणून प्राध्यापिकेवर कारवाई; पोलीस अधिकाऱ्याच्या कृतीवर उच्च न्यायालयाचा संताप

राज्यघटनेतील अभिव्यक्ती स्वातंत्र्याशी संबंधित अनुच्छेद वाचा आणि या प्रकरणी कोणताही गुन्हा दाखल करतो येऊ शकतो का ते सांगा ? असा…

nashik goon harshad patankar
Video: नाशिकमध्ये मिरवणुकीने स्वागत होणारा सराईत गुन्हेगार पुन्हा कारागृहात

नागरिकांमध्ये दहशत माजविण्यासाठी गुन्हेगारांकडून झालेली कृती ही कायदा व सुव्यवस्थेला आव्हान देणारी आहे.

Nashik Crime News
Nashik Crime: नाशिकमध्ये गुंडाची ‘बॉस इज बॅक’ म्हणत मिरवणूक, ‘गोली मार भेजे में’ गाण्यावर नाच; व्हिडीओ व्हायरल

Nashik Crime News : नाशिकमध्ये कुख्यात गुंडांची मिरवणूक, व्हिडीओ व्हायरल.

shikhar bank fraud
शिखऱ बँक गैरव्यवहार प्रकरण बंद करण्याच्या मुंबई पोलिसांच्या अहवालाविरोधात ११ निषेध याचिका

आणखी निषेध याचिका केल्या जाणार असल्याचे मूळ तक्रारदाराच्यावतीने न्यायालयाला सांगण्यात आले.

traffic closed on 15 roads in Pimpri Chinchwad
पिंपरी-चिंचवडमधील १५ रस्त्यांवरील वाहतूक बंद, पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे पोलिसांचे आवाहन

मावळ परिसर तसेच पिंपरी – चिंचवड शहरात मध्यरात्रीपासून मुसळधार पाऊस कोसळत असल्याने ठिकठिकाणी पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात रस्त्यावर आले.

Gurugram News 5 year old boy drowns in swimming pool
पालकांनो, तुमच्या चिमुरड्यांची काळजी घ्या; गुडगावमध्ये ५ वर्षांच्या मुलाचा स्वीमिंग पूलमध्ये बुडून मृत्यू!

सोसायटी व्यवस्थापनाच्या आणि लाईफ गार्डच्या दुर्लक्षामुळे स्वीमिंग पूलमध्ये बुडून पाच वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे.

molestation case, key seller, police, vasai
‘त्या’ चावी विक्रेत्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल, पोलिसांनी सूडबुध्दीने कारवाई केल्याचा आरोप

पोलिसांविरोधात तक्रार केल्याने मला नाहक खोट्या गुन्ह्यात गुंतविल्याचा आरोप चावी विक्रेता अन्सारी याने केला आहे.

pune army jawan detained
पुणे: लष्करात नोकरीच्या आमिषाने फसवणूक करणारा जवान ताब्यात; लष्करी गुप्तचर यंत्रणेची कारवाई

लष्करात नोकरीच्या आमिषाने तरुणाची फसवणूक करण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका जवानाविरुद्ध बंडगार्डन पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

Nagpur,Police Complaints Authority , vacancies, state level, divisional level, injustice, abuse, common citizens, Supreme Court, Mumbai, Nagpur, Amravati, Chhatrapati Sambhajinagar, Nashik, Pune, MPSC, Home Affairs, recruitment,
पोलीस तक्रार प्राधिकरण ठरतोय पांढरा हत्ती?

पोलीस अधिकारी किंवा कर्मचाऱ्याने सामान्य नागरिकांवर अन्याय-अत्याचार केला तर त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी पोलीस तक्रार प्राधिकरणाची स्थापना करण्यात आली.

Rahat Fateh Ali Khan
Rahat Fateh Ali Khan : राहत फतेह अली खान यांनी अटकेचं वृत्त फेटाळलं; म्हणाले, “शत्रू…”

पाकिस्तानी गायक राहत फतेह अली खान यांना दुबई विमानतळावर अटक करण्यात आली असल्याचं वृत्त माध्यमांमध्ये झळकलं होतं.

A policeman assaulted a PMP driver along with a carrier Pune
पोलीस कर्मचाऱ्याची मुजोरी; पीएमपी चालकासह वाहकाला मारहाण

पोलीस कर्मचाऱ्याने पीएमपी बसमध्ये शिरून चालक आणि वाहकाला मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मारहाणीची चित्रफीत समाज माध्यमात प्रसारित झाल्यानंतर…

house help steal ornaments to buy dslr
रील्ससाठी कॅमेरा हवा म्हणून कामवाल्या बाईने केली दागिन्यांची चोरी

रील तयार करण्यासाठी महागाचा कॅमेरा हवा याकरता दिल्लीत बंगल्यात काम करणाऱ्या महिलेने दागिन्यांची चोरी केली.

संबंधित बातम्या