Google तुमचे बोलणे चोरून तर ऐकत नाही ना? जाणून घ्या का दिसतात आपण बोललेल्या प्रत्येक गोष्टीच्या जाहिराती | Does Google listen to all the things you say? Find out why ads appear for everything | Loksatta

Google तुमचे बोलणे चोरून तर ऐकत नाही ना? जाणून घ्या का दिसतात आपण बोललेल्या प्रत्येक गोष्टीच्या जाहिराती

कधी कधी असं वाटतं की हा निव्वळ योगायोग आहे की गुगल खरंच आपलं सगळं बोलणं ऐकतं.

Google तुमचे बोलणे चोरून तर ऐकत नाही ना? जाणून घ्या का दिसतात आपण बोललेल्या प्रत्येक गोष्टीच्या जाहिराती
हा निव्वळ योगायोग आहे की गुगल खरंच आपलं बोलणं ऐकतंय?

अनेकवेळा आपण सर्वांना हे लक्षात आले असेल की आपण आपल्या घरात जे बोलतो, त्याच्या पुढच्याच क्षणी आपण आपल्या मोबाईलवर त्याची जाहिरात पाहतो. हे सर्व बघून कधी कधी असं वाटतं की हा निव्वळ योगायोग आहे की गुगल आपलं सगळं ऐकतं. सामान्यतः, अँड्रॉइड फोनमध्ये गुगल व्हॉइस असिस्टंट फीचर असते, जे तुम्ही ‘ओके गुगल’ बोलून सक्रिय करू शकता.

तुम्ही तुमच्या स्मार्टफोनवरील माइक आयकॉनवर क्लिक करून गुगल व्हॉइस सर्च देखील वापरू शकता. पण माइक चालू असो वा नसो, गुगल सर्व काही ऐकते का हा प्रश्न लोकांच्या मनात कायम आहे. फक्त कल्पना करा की तुम्ही तुमची कार विकण्याशी संबंधित काहीतरी बोलला आहेत. ही गोष्ट तुम्ही फोनवरही बोलली नाही. मात्र यावेळी तुमचा फोन तुमच्या जवळ होता.

Google ला टक्कर देण्यासाठी Apple लवकरच आणणार स्वतःचे सर्च इंजिन; जाणून घ्या तपशील

त्यानंतर दुसऱ्या दिवसापासून तुमच्या मोबाईल ब्राउझर आणि फेसबुकवर वाहन विक्रीच्या जाहिराती येऊ लागल्याचे दिसून येते. हा निव्वळ योगायोग आहे की गुगल खरंच आपलं बोलणं ऐकतंय? लोकांच्या मते, असे अनेक प्रसंग येतात जेव्हा आपण एखाद्या मुद्द्यावर चर्चा करतो आणि काही वेळाने आपण आपल्या मोबाईलवर त्याची जाहिरात पाहू लागतो.

पुरुष Google वर सर्वात जास्त काय सर्च करतात? संशोधनातून झाले अनेक रंजक खुलासे

अशा परिस्थितीत, या प्रश्नाचे योग्य उत्तर देणे थोडे कठीण आहे, परंतु तरीही आपण सावधगिरी बाळगली पाहिजे. किंबहुना, गुगल आणि फेसबुकसारख्या कंपन्या, त्या युजर्सची बोलणे ऐकत असतात या गोष्टीपासून नकार देतात. कंपन्यांचे म्हणणे आहे की ते कोणाच्या गोपनीयतेत ढवळाढवळ करत नाहीत. गुगल गोपनीयता धोरणानुसार, ते परवानगीशिवाय युजर्सचे संभाषण रेकॉर्ड करत नाहीत. अशा परिस्थितीत, बचाव करण्याचा एकच मार्ग आहे, तो म्हणजे मायक्रोफोनचा वापर करत नाहीत असे अ‍ॅप्स वापरणे.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान ( Tech ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
११ GB RAM, ५००० mAh बॅटरीवाला फोन फक्त आठ हजारांमध्ये; जाणून घ्या या स्वस्तात मस्त फोनबद्दल

संबंधित बातम्या

YOUTUBE TOP 10 यादी जाहीर, 2022 मध्ये ‘या’ व्हिडिओजना सर्वाधिक पसंती, कोणी पटकवले पहिले स्थान? पाहा
आता WhatsApp वर मराठीतून करा मेसेज; कोणती अ‍ॅप्स करतात मदत जाणून घ्या

व्हिडिओ

ताज्या बातम्या
चीनमध्ये जनआंदोलनानंतर करोना निर्बंध शिथिल 
तृतीयपंथीयांना नोकरीची संधी डावलता येणार नाही; उच्च न्यायालयाने राज्य सरकारला फटकारले
नेत्यांकडे स्वत:ची मते, व्यासंग असावा – देवेंद्र फडणवीस
गोवर रुग्णांच्या नमुन्यांच्या तपासणीसाठी हाफकीन तयार
Maharashtra Karnataka border: एसटीच्या ३८२ फेऱ्या अंशत: रद्द