जर तुम्ही कर्मचारी भविष्य निर्वाह निधी अंतर्गत खाते उघडले असेल आणि अद्याप नामनिर्देशित व्यक्तीचे नाव (ई-नॉमिनेशन) जोडले नसेल, तर तुम्ही तुमच्या EPF खात्याचे पासबुक डिटेल्स पाहू शकणार नाहीत. कारण EPFO ​​ने आता EPF पासबुक पाहण्यासाठी ई-नॉमिनेशन अनिवार्य केले आहे. जर ई-नामांकन जोडले नाही, तर तुम्ही पासबुकशी संबंधित कोणतेही काम करू शकत नाही. यापूर्वी पीएफ खातेधारक त्यांच्या पासबुकचे डिटेल्स तपासले जात होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

२९ डिसेंबर २०२१ रोजी, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) ने खातेदारांसाठी ई-नामांकन प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी अंतिम तारीख वाढवली होती. आता ईपीएफ खातेदार यानंतरही हे काम करू शकणार आहेत. त्यांनी ही प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करावी, अशी माहिती संघटनेकडून देण्यात आली आहे. अन्यथा भविष्यात त्यांना गैरसोयीचा सामना करावा लागू शकतो.

आणखी वाचा : तुम्हीही Gmail वापरत असाल, तर आता तुम्ही तुमच्या फोनवरून सिक्रेट मेसेजही पाठवू शकता; प्रक्रिया जाणून घ्या

त्याचबरोबर ही मुदत वाढवल्याने अनेक खातेदारांना त्यांचे ई-पासबुक वापरताना मोठी समस्या भेडसावत आहेत. ई-पासबुक पाहण्यात किंवा त्याचा तपशील तपासताना त्यांना ही समस्या भेडसावत आहे, कारण त्यांनी त्यांची ई-नोंदणी प्रक्रिया पूर्ण केलेली नव्हती. त्यांच्या EPFO ​​खात्यांमध्ये लॉग इन केल्यानंतर, ग्राहकांना त्यांची पासबुक पाहण्यासाठी त्यांची ई-नोंदणी प्रक्रिया पूर्ण करण्यास सांगणारा पॉप-अप संदेश प्राप्त होत होता.

आणखी वाचा : Airtel, Jio आणि Vi चे ५०० रुपयांच्या आतील हे बेस्ट रिचार्ज प्लॅन, ८४ दिवसांची वैधता आणि बरंच काही…

ई-नामांकन कसे जोडायचे ?
ईपीएफओ खातेधारक आता घरी बसूनही ई-नॉमिनेशनची प्रक्रिया पूर्ण करू शकतात. त्यासाठी संस्थेने आपल्या पोर्टलवर ही सुविधा दिली आहे. मात्र, यासाठी UAN असायला हवे आणि मोबाईल नंबर आधारशी लिंक केला पाहिजे.

  • ई-नामांकन जोडण्यासाठी, प्रथम EPFO ​​च्या अधिकृत वेबसाइटवर जा आणि “सेवा” मेनूवर क्लिक करा.
  • त्यानंतर “कर्मचारी” पर्यायावर जा आणि “सदस्य UAN / ऑनलाइन सेवा” वर क्लिक करा.
  • आता तुमचा UAN आणि पासवर्ड वापरून तुमच्या EPFO ​​खात्यात लॉग इन करा.
  • यानंतर, “मॅनेज टॅब” अंतर्गत, “ई-नामांकन” वर क्लिक करा.
  • पुढील पानावर बदल करण्यासाठी होय वर क्लिक करा.
  • तुमचे ई-नामांकन तपशील अपडेट करा आणि तुम्ही तुमच्या खात्यात एकापेक्षा जास्त नॉमिनी जोडू शकता.
  • आता “सेव्ह EPF नामांकन” बटणावर क्लिक करा आणि OTP द्वारे तपशील सत्यापित करण्यासाठी “ई-साइन” पर्यायावर टॅप करा.
  • त्यानंतर OTP टाका, त्यानंतर ई-नामांकन यशस्वीरित्या पूर्ण होईल.
मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Epfo update if you do not joint e nomination in epf account then you will not be able to see the details of account passbook prp
First published on: 11-01-2022 at 20:43 IST