Flipkart या ई-कॉमर्स वेबसाइटवर Big Saving Days Sale ला नुकतीच सुरुवात झाली आहे. १० जून रोजी सुरु झालेला हा सेल चार दिवसांनी म्हणजेच १४ जून रोजी संपणार आहे. या सेलअंतर्गत विविध स्मार्टफोन्सवर आकर्षक ऑफर्स दिल्या जात आहेत. यामध्ये iPhone 13, Samsung Galaxy F23, Poco X5 अशा अनेक स्मार्टफोन्सवर फ्लॅट डिस्काउंट मिळत असल्याचे पाहायला मिळते. त्यासह ग्राहक बॅंकांचे कार्ड्सवरील ऑफर्स आणि एक्सचेंज ऑफर्सचा फायदा घेऊ शकणार आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

Poco X5 5G

फ्लिपकार्टवर Poco X5 5G हा स्मार्टफोन १५,९९९ रुपये किंमतीसह लिस्ट करण्यात आला आहे. ग्राहक १४,९९९ रुपयांना हा फोन खरेदी करु शकतात. भारतामध्ये लॉन्चच्या वेळी या फोनची किंमत १८,९९९ रुपये होती. याचा अर्थ सेलमध्ये पोकोच्या फोनवर चार हजार रुपयांची सवलत मिळत आहे.

iPhone 13

फ्लिपकार्टवर iPhone 13 च्या 128GB स्टोरेज मॉडेलची किंमत ५८,७४९ रुपये इतकी आहे. Apple च्या ऑनलाइन स्टोअरवर या आयफोनची किंमत ६९,९९९ रुपये आहे असे लिहिलेले आहे. थोडक्यात फ्लिपकार्टच्या सेलमध्ये iPhone 13 वर ग्राहकांना ११,१५१ रुपयांचा डिस्काउंट मिळत आहे. यावर कोणत्याही अटी, नियम लागू नसल्याचेही दिसते. SBI बॅंकेचे क्रेडिट कार्डने आयफोन खरेदी केल्यावर १० टक्के डिस्काउंट दिला जातो. असे केल्याने त्याची किंमत ५७,९९९ इतकी होईल.

Samsung Galaxy F23 5G

मार्च २०२३ मध्ये सॅमसंगचा Samsung Galaxy F23 5G हा फोन लॉन्च करण्यात आला. तेव्हा त्याची किंमत १७,९९९ रुपये इतकी होती. फ्लिपकार्टच्या सेलमार्फत हा फोन ग्राहक १३,४९९ रुपये देऊन खरेदी करु शकतात. फ्लिपकार्टवर ६,५०० रुपयांची सूट मिळते हे स्पष्ट होते. याव्यतिरिक्त Samsung Galaxy F13 हा फोन १०,९९९ रुपयांना; Samsung Galaxy M14 हा फोन १४,३२७ रुपयांना उपलब्ध आहे.

आणखी वाचा – Twitter जाहिरातींच्या मोबदल्यात कन्टेंट क्रिएटर्संना देणार पैसे, एलॉन मस्क यांची मोठी घोषणा

Moto G62

फ्लिपकार्ट बिग सेव्हिंग डेज सेलमध्ये Moto G62 या फोनची किंमत १४,४९९ रुपये आहे असे नमूद करण्यात आले आहे. पण हा फोन १५,४९९ रुपयांना लिस्ट करण्यात आला होता. या 5G स्मार्टफोनमध्ये स्टॉक Android इंटरफेस आहे. Moto G62 व्यतिरिक्त Nothing Phone (1), Pixel 6a, iPhone 14, Motorola Edge 40 अशा 5G स्मार्टफोन्सवर फ्लिपकार्टवर डिस्काउंट मिळत आहे.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Flipkart big saving days sale starts from today 14 june is last date deals and offers revealed on iphone 13 poco x5 samsung galaxy series know more yps