WhatsApp वर टेक्स्टसह फॉरवर्ड करता येणार फाईल्स; जाणून घ्या कोणाला वापरता येणार नवे फीचर

WhatsApp New Feature: फॉरवर्ड मेसेजसाठी व्हॉटसअ‍ॅपवर आलेले नवे फीचर काय आहे जाणून घ्या

Forward Media With Caption this WhatsApp new feature is now available for Android Users know more
व्हॉटसअ‍ॅपचे नवे फीचर (प्रातिनिधिक फोटो)

WhatsApp New Feature: व्हॉटसअ‍ॅपने संवाद साधणे, मीडिया फाईल शेअर करणे अगदी सोपे केले आहे. कॉल, व्हिडीओ कॉल, मीडिया फाईल शेअर करणे अशा अनेक सुविधा व्हॉटसअ‍ॅपवर उपलब्ध आहेत. त्यामुळे व्हॉटसअ‍ॅप हे लोकप्रिय मेसेजिंग अ‍ॅप आहे. व्हॉटसअ‍ॅपकडुन युजर्स
साठी सतत नवनवे फीचर्स लाँच केले जातात. असेच एक नवे फीचर सध्या चर्चेत आहे, जे सध्या फक्त काही युजर्ससाठी उपलब्ध आहे.

व्हॉटसअ‍ॅपवर कोणताही मेसेज, फोटो, व्हिडीओ सहज फॉरवर्ड करता येतो, हे सर्वांनाच माहित असेल. पण आता नव्या फीचरचा वापर करून युजर्सना त्याबरोबर असणारा टेक्स्ट मेसेजही फॉरवर्ड करता येणार आहे. याआधी तुम्ही फाईल फॉरवर्ड करताना, त्याबरोबर असणारा टेक्स्ट फॉरवर्ड केला जात नसे, फक्त मिडीया फाईल्स फॉरवर्ड होत असत. यात आता टेक्स्ट मेसेजही फॉरवर्ड करता येणार आहे.

आणखी वाचा- SBI WhatsApp Banking: बँक बॅलन्स, मिनी स्टेटमेंट, पेन्शन स्लिप व्हॉटसअ‍ॅपवर मिळवा; जाणून घ्या सोप्या स्टेप्स

‘व्हॉटसअ‍ॅप बीटा इन्फो’ने दिलेल्या माहितीनुसार अँड्रॉइड युजर्ससाठी हे फीचर उपलब्ध झाले आहे. या फीचरचा वापर करून युजर्सना कोणताही कंटेन्ट फॉरवर्ड करताना त्याबरोबर असणारा टेक्स्ट मेसेजही फॉरवर्ड कॅप्शन स्वरुपात शेअर करता येणार आहे. या कॅप्शन फीचरमुळे, तो कीवर्ड टाकून चॅटमधुन ते शोधणे सहज शक्य होईल.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 11-01-2023 at 18:52 IST
Next Story
टाटा समूह भारतात उघडणार Apple चे १०० एक्सक्लुझिव्ह स्टोअर्स
Exit mobile version